Kevin Pietersen Post Sparks Debate: इंग्लंड संघाने चौथ्या कसोटीत ६६९ धावा करत मँचेस्टरच्या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली. इंग्लंडने या धावसंख्येसह पहिल्या डावात ३११ धावांची मोठी आघाडी मिळवली. पण इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

केविन पीटरसनने कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये गोलंदाजीचा दर्जा घसरल्यामुळे २०-२५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्याच्या काळात फलंदाजी करणं “खूप सोपं” झाल्याचं म्हटलं आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर पीटरसनने पोस्ट शेअर केली.

केविन पीटरसनचं आधुनिक काळातील फलंदाजीबाबत मोठं वक्तव्य

पीटरसनने शनिवारी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “माझ्यावर वैतागू नका, पण गेल्या २०-२५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत हल्ली फलंदाजी करणं खूप सोपं झालं आहे. कदाचित तेव्हा फलंदाजी करणं आजच्यापेक्षा दुप्पट कठीण होतं.”

पीटरसनने त्याच्या काळातील अनेक दिग्गज गोलंदाजांची नावं घेतली आणि क्रिकेटप्रेमींना या दिग्गजांशी तुलना करता येईल असे १० समकालीन गोलंदाजांची नावे सांगण्याचं आव्हान दिलं. पीटरसनने पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “वकार, शोएब, अक्रम, मुश्ताक, कुंबळे, श्रीनाथ, हरभजन, डोनाल्ड, पोलॉक, क्लुसनर, गॉफ, मॅकग्रा, ब्रेट ली, वॉर्न, गिलेस्पी, बाँड, व्हेटोरी, केर्न्स, वास, मुरली, कर्टली, कोर्टनी आणि यादी खूप मोठी होऊ शकते. ‘मी वर २२ गोलंदाजांची नावं सांगितली आहेत. कृपया मला वर दिलेल्या नावांशी मेळ साधणाऱ्या सध्याच्या १० गोलंदाजांची नाव सांगू शकाल?”

अनेक चाहते पीटरसनशी सहमत आहेत, तर काहींना वाटतx की आधुनिक क्रिकेटला अजून वेगळी आव्हानं आहेत. यावरू वादविवाद सुरूच आहे, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, जो रूटच्या फलंदाजीने मात्र चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडकडून मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडच्या टॉप-४ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आणि भारताच्या गोलंदाजांना घाम फोडला. तर जसप्रीत बुमराह लयीत नसल्याचा फटकाही भारताला बसला. याशिवाय जो रूटने १५० धावांची वादळी खेळी केली. या खेळीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दोन वर्षांनी कसोटीत शतक झळकावलं.