Kevin Pietersen Says Ravindra Jadeja is not Muralidharan or Shane Warne : इंग्लंडचा संघ भारतात येण्यासाठी सज्ज झाला असून २५ जानेवारीपासून हैदराबाद येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या एकविसाव्या शतकात इंग्लंडच्या संघाने भारतात येऊन केवळ एकदाच कसोटी मालिका जिंकली आहे. यावेळी ते बॅझबॉलच्या आक्रमक शैलीने भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्तत्पूर्वी केविन पीटरसनने भारताच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी इंग्लंडला महत्त्वाचा गुरुमंत्र दिला आहे.

भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला सामोरे जाण्याचा मंत्र केविन पीटरसनने इंग्लिश फलंदाजांना दिला आहे. तो म्हणाला रवींद्र जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही. त्यामुळे जर तंत्र बरोबर असेल तर तुम्हाला त्याच्यापासून धोका नाही, असे त्याने म्हटले आहे.

‘रवींद्र जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही’ –

‘द टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पीटरसन म्हणाला, “मी जडेजाचा खूप सामना केला आहे. हे सर्व आपल्या तंत्राबद्दल आहे. रवींद्र जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, जो बहुतेक एका बाजूने गोलंदाजी करतो. कधीकधी त्याचा चेंडू सरकतो. निसरड्या चेंडूंना सामोरे जाण्यासाठी तुमचे तंत्र चांगले असेल, तर तुम्हाला जडेजाविरुद्ध कोणतीही अडचण येणार नाही. जर तुमचे पाय योग्य ठिकाणी असतील, तुम्ही पुढच्या पायावर खेळत नसाल, तुम्ही चेंडूच्या दिशेने मागे खेळत असाल तर तुम्ही सुरक्षित असाल. फक्त बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू होणार नाही याची काळजी घ्या.”

हेही वाचा – IND vs ENG : “इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ला भारत ‘विराटबॉल’ने उत्तर देईल”, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फक्त बोल्ड आणि एलबीडब्ल्यू होणं टाळावं लागेल’ –

केविन पीटरसन पुढे म्हणाला, “तुम्ही जडेजाचे चेंडू स्लिपच्या दिशेने खेळत असलात तरी हरकत नाही. त्याच्या चेंडूच्या लाइन आणि लेंथचा अंदाज लावण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. तुम्हाला फक्त बोल्ड आणि एलबीडब्ल्यू होणं टाळावं लागेल.” पीटरसनने येथे आर अश्विनचाही उल्लेख केला. जुन्या कसोटी मालिकेची आठवण करून देताना तो म्हणाला की, अश्विन कोणता चेंडू टाकणार आहे हे मला समजायचे. मी अश्विनचे ​​’दुसरा’ चेंडू ऑफ साइडला खूप मारायचो हे सगळ्यांनी पाहिलं असेल असंही पीटरसन म्हणाला.