KL Rahul Diet Plan: केएल राहुल सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर संघाला वनडे मालिका खेळायची आहे, राहुल या संघाचा भागही असणार आहे. दरम्यान जतीन सप्रूला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याचा डाएट प्लॅनबद्दल सांगितलं आहे. असा एक पदार्थ आहे जो राहुल घरी असताना अगदी रोज खाऊ शकतो. पाहूया काय आहे केएल राहुलचा डाएट प्लॅन?

केएल राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फारशी प्रभावी कामागिरी करू शकला नाही. दोन्ही डावांमध्ये तो लवकर बाद झाला. तर भारताला देखील पहिल्या कसोटीत घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-२ अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे भारतीय संघाला मालिका पराभवापासून वाचण्यासाठी गुवाहाटी कसोटीत विजय महत्त्वाचा असेल. यासह वरिष्ठ खेळाडू म्हणून गुवाहाटी कसोटीतील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.

केएल राहुलचा डाएट प्लॅन नेमका कसा आहे?

केएल राहुल डाएट प्लॅननुसार सकाळी नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला व रात्रीच्या जेवणासाठी काय काय आणि किती प्रमाणात खातो? जाणून घेऊया. द ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या मुलाखतीत जतीन सप्रूशी बोलताना केएल राहुल म्हणाला, “माझं डाएट, माझं खाणं अगदी साधं असतं. मी नाश्त्याला डोसाबरोबर भूर्जी किंवा अंड खातो. मी जर भारतात माझ्या घरी आहे आणि डोसा मिळतोय तर मी आठवड्यात रोज ६ दिवस डोसा खाईन. ४ अंडी मी खातो, कार्ब्ससाठी डोसा खातो, प्रोटीन्ससाठी केळं, बेरी, नट्स खातो.”

दुपारच्या जेवणाबाबत सांगताना राहुल म्हणाला, “मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी दुपारच्या जेवणात भारतीय पद्धतीचं जेवण असतं. ट्रेनिंग सामने नसले की मी १५० ग्रॅम कार्बाेहायड्रेट म्हणजे भात असतो. सामने असले की भाताचं ते प्रमाण वाढवून मी २०० ग्रॅम करतो. यासह २००-२५० ग्रॅम प्रोटीन्स खातो. मला सी फुड खूप आवडतं, कधी कधी मटण असतं. याशिवाय, तो १५०-२०० ग्रॅम हिरव्या भाज्या देखील खातो. त्या कोणत्याही स्वरूपात असू शकतात. उदाहरणार्थ, स्क्रॅम्बल्ड बीन्स असू शकते. त्याचप्रमाणे, इतर पदार्थ देखील समाविष्ट आहेत.”

केएल राहुलने शेवटी त्याच्या जेवणाबद्दल सांगितलं की, रात्रीच्या जेवणातही हेच पदार्थ असतात फरक एवढाच की जेवणाचे प्रमाण कमी असते.