KL Rahul Century: भारतीय संघ अडचणीत असताना केएल राहुल पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मदतीला धावून आला आहे. पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली आणि दमदार शतक झळकावलं आहे. या खेळीसह भारतीय संघाने २०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. या शतकी खेळीसह केएल राहुलने सुनील गावस्कर आणि केएल राहुल सारख्या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

तसं पाहायला तर केएल राहुल हा वर्तमान कसोटी भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला एक असा फलंदाज हवा होता जो एक बाजू धरून ठेवेल. केएल राहुलने या सामन्यातील पहिल्या डावातही भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र, ४२ धावा करून त्याला माघारी परतावं लागलं. चांगल्या सुरुवातीचा जैस्वाल, गिल आणि ऋषभ पंतने चांगला फायदा घेतला. या डावात गिल आणि जैस्वाल स्वस्तात माघारी परतले. पण केएल राहुल खंबीरपणे उभा राहिला आणि आपलं शतक पूर्ण केलं.ॉ

कसोटी क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडला

हे केएल राहुलचं कसोटी क्रिकेटमधील ९ वे शतक ठरले आहे. तर इंग्लंडमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून ३ शतकं झळकावणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विजय मर्चंट आणि रवी शास्त्री या दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या दिग्गजांच्या नावे इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून २ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज

केएल राहुल –३
सुनील गावसकर –२
राहुल द्रविड –२
विजय मर्चंट – २
रवी शास्त्री –२

भारतीय संघ मजबूत स्थितीत

या डावात भारतीय संघ ६ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला. भारतीय संघाकडून सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. साई सुदर्शनने ३० धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिल ८ धावांवर तंबूत परतला. उपकर्णधार ऋषभ पंत आणि केएल राहुलने मिळून १९५ धावांची भागीदारी केली. पंतने ११८ धावा केल्या, तर राहुल अजूनही नाबाद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.