KL Rahul RCB Comeback Hint: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सध्या बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. गेल्या बऱ्याच काळापासून राहुलच्या आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स संघातील भविष्याबाबत चर्चा सुरू आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलग ३ हंगाम कर्णधार असलेला राहुल पुढील हंगामातही फ्रँचायझीचा भाग राहणार का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. यादरम्यानच त्याच्या जुन्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये त्याच्या पुनरागमनाची चर्चाही जोर धरत असून आता खुद्द राहुलनेच याबाबत मोठा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने पुन्हा बंगळुरू संघात परतण्याची आशा व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “रोहित तंत्रकुशल नाही, तो कठोर सरावही करत नाही”, जॉन्टी ऱ्होड्स रोहित शर्माबद्दल नेमकं काय म्हणाला? सचिनचा उल्लेख करत म्हणाला…

बांगलादेश मालिकेसाठी केएल राहुलची भारतीय संघात निवड होण्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण पहिल्या कसोटीसाठी त्याची संघात निवड झाली आहे आणि प्लेईंग इलेव्हनमध्येही त्याला संधी मिळू शकते असे चित्र आहे. पण गेल्या काही काळातील त्याची कामगिरी पाहता कसोटी सामन्यासाठी त्याची संघात निवड झाल्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. याचप्रमाणे आयपीएलमध्येही गेल्या हंगामात केएल राहुल फलंदाजी, नेतृत्त्व यात कमी पडला होता. त्यामुळे लखनौ संघ त्याला रिलीज करेल असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा – IRE W vs ENG W: आयर्लंडच्या महिला संघाने इंग्लंडला पराभूत करत घडवला इतिहास, १ चेंडू बाकी असताना मिळवला रोमांचक विजय, पाहा VIDEO

राहुलने आरसीबीमध्ये परतण्याचे दिले संकेत

पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी राहुल दुसऱ्या संघात जाणार अशी चर्चा आहे आणि आता एका व्हिडीओमध्ये त्याने आरसीबीमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने राहुलला सांगितले की तो RCB चा मोठा चाहता आहे आणि त्याला राहुलला या फ्रँचायझीसाठी परत खेळताना पाहायचे आहे, ज्यावर राहुलने सुरुवातीला काहीच उत्तर दिले नाही. यानंतर चाहत्याने राहुलला म्हटले की, तू स्पष्ट काही व्हिडीओमध्ये बोलावं असं माझं म्हणण नाही, पण तुला पुन्हा आरसीबीमध्ये दमदार कामगिरी करताना पाहण्याची इच्छा आहे आणि यावेळी राहुलनेही उत्तर दिले. राहुल फक्त म्हणाला- ‘ अशी आशा करूया’.

हेही वाचा – माजी भारतीय क्रिकेटपटूची अवघ्या महिनाभरात केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी, अंतर्गत वादाचा फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुलचे हे दोन शब्दात दिलेल्या उत्तरानेही चर्चांना उधाण आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयपीएल २०२४ मधील त्याच्या अपयशाने केवळ चाहतेच नाही तर संघाचे मालक संजीव गोयंका देखील नाराज झाले होते. एका सामन्यातील दारूण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका यांनी मैदानात येऊन कॅमेऱ्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यातच राहुल गोयंका यांच्या कोलकात्यातील घरी गेला होता. एका दिवसानंतर गोयंका यांनी पत्रकार परिषदेत राहुलच्या भविष्याबाबत काहीही ठोस उत्तर दिले नाही आणि फक्त एवढेच सांगितले की, राहुल कुटुंबासारखा आहे.