scorecardresearch

‘या’ खेळाडूंच्या डोक्यावर सजला ‘ऑरेंज कॅप’चा ताज; ‘असा’ आहे १५ वर्षांचा IPL इतिहास, वाचा संपूर्ण यादी

२००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. तेव्हा ही ऑरेंज कॅप ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज शॉन मार्शने पंजाब किंग्जकडून खेळताना जिंकली होती.

Orange Cap Winners In IPl History
या फलंदाजांनी IPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकली. (Image-Indian Express)

Orange Cap Winners In IPL History : आयपीएल ट्रॉफीवर जेतेपदाचं शिक्कामोर्तब करण्यासाठी ज्याप्रकारे सर्व संघांमध्ये रस्सीखेच सुरु असते, अशाचप्रकारे फलंदाज आणि गोलंदाजांमध्येही मोठी स्पर्धा सुरु असते. कारण आयपीएलच्या सीजनमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देऊन सन्मानित केलं जातं. त्यामुळे फलंदाजांमध्ये धावांची जोरदार स्पर्धा रंगलेली असते. अशातच आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या १५ वर्षांच्या सीजनमध्ये कोणत्या फलंदाजांनी ऑरेंज कॅप जिंकलं आहे, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.

ऑरेंज कॅप काय असतं?

आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचा फलंदाज पूर्ण सीजनमध्ये सर्वात जास्त धावा करतो, तेव्हा त्याला ऑरेंज कॅप दिली जाते. २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. तेव्हा ही ऑरेंज कॅप ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज शॉन मार्शने पंजाब किंग्जकडून खेळताना जिंकली होती. तर २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या १५ व्या सीजनमध्ये जोस बटलरने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. विशेष म्हणजे यंदाही ऑरेंज कॅपसाठी तगडा मुकाबला पाहायला मिळू शकतो.

नक्की वाचा – ‘हा’ आहे IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; भारताच्या ‘या’ खेळाडूंनीही मारली बाजी, पाहा १५ वर्षांची यादी

IPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारे फलंदाज

शॉन मार्श (पंजाब किंग्ज), ६१६ धावा, वर्ष २००८
मॅथ्यू हेडन (चेन्नई सुपर किंग्ज), ५७२ धावा, वर्ष २००९
सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स), ६१८ धावा, वर्ष, २०१०
ख्रिस गेल (आरसीबी), ६०८ धावा, वर्ष २०११
मायकल हसी, (सीएसके), ७३३ धावा, वर्ष २०१३
रॉबिन उथप्पा, (कोलकाता नाईट रायडर्स), ६६० धावा, वर्ष २०१४
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ५६२ धावा, वर्ष २०१५
विराट कोहली, (आरसीबी), ९७३ धावा, वर्ष २०१६
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६४१ धावा, वर्ष २०१७
केन विलियमसन, (सनरायजर्स हैद्राबाद), ७३५ धावा, वर्ष २०१८
डेविड वॉर्नर, (सनरायजर्स हैद्राबाद), ६९२ धावा, वर्ष २०१९
के एल राहुल, (पंजाब किंग्ज), ६७० धावा, वर्ष २०२०
ऋतुराज गायकवाड, (सीएसके), ६३५ धावा, वर्ष २०२१
जॉस बटलर, (राजस्थान रॉयल्स), ८६३ धावा, वर्ष २०२२

या संघाच्या खेळाडूंनी जिंकली सर्वात जास्त वेळा ऑरेंज कॅप

आयपीएल इतिहासात सनरायजर्स हैद्राबादने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. हैद्राबादच्या चार फलंदाजांनी ऑरेंज कॅप जिंकली आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबीच्या फलंदाजांनी ३-३ वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. तसंच पंजाब किंग्जने २ आणि राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी १-१ वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 17:24 IST

संबंधित बातम्या