International Olympic Day 2022: मानवी जीवनात खेळांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मनोरंजन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी जगभरात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. या विविध खेळांना आणि खेळाडूंना एकाच छताखाली आणण्यासाठी दर चार वर्षांतून एकदा खेळांच्या कुंभमेळ्याचे अर्थात ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत जगभरातील हजारो खेळाडू सहभागी होतात. खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस आणखी वाढत जावो यासाठी दरवर्षी २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, आज जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा होत आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी एक वेगळी थीम निश्चित केली जाते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवसासाठी, ‘एकत्र, शांत जगासाठी’ (Together, For a Peaceful World) अशी थीम ठेवण्यात आली आहे. लोकांना शांततेत एकत्र आणण्याची ताकद खेळामध्ये असते. युक्रेन-रशियन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही थीम निश्चित करण्यात आली आहे.

International Institute of Population Sciences Mumbai Bharti For Research Officer and Junior Research Office post
IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत भरती; ५५ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज
Make a sweet and testy khava poli
खमंग खुसखुशीत खव्याची पोळी, गुढीपाडव्यासाठी बनवा खास बेत! नोट करा सोपी रेसिपी
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Loksatta viva Indian National Calendar Official National Calendar of Indians
भारतीयांचे नववर्ष!

हेही वाचा – आपल्याच संघाविरोधात खेळणार ‘हे’ खेळाडू, लीसेस्टरशारयच्या संघात चार भारतीयांचा समावेश

वय, लिंग, वंश किंवा धर्म यांची पर्वा न करता जगभरातील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात ठिकठिकाणी ऑलिंपिक खेळांविषयी प्रदर्शने आणि शैक्षणिक चर्चासत्रेही आयोजित केली जातात.

आधुनिक ऑलिंपिक खेळांचे आयोजन, प्रचार आणि नियमन करण्यासाठी २३ जून १८९४ रोजी पॅरिसमधील सोर्बोन येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची (आयओसी) स्थापना करण्यात आली होती. त्या दिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा होतो. आयसीओ सदस्य डॉक्टर ग्रुस यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ४१व्या हंगामात ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिना’ची संकल्पना मांडली होती. यानंतर २३ जून १९४८ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांना या कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली होती.

गेल्या दशकभराच्या काळात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने अनेक देशांना आणि त्या देशांतील हजारो खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले आहे.