लॉर्डच्या मैदानावरील सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये अंगावरील टी-शर्ट उतरवून विजयी जल्लोष करून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अॅण्ड्र्यू फ्लिंटॉफला ‘जशास तसे’ उत्तर देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली अर्थात दादा आठवतोय का? पण आज तोच क्रिकेटमधील दादा आता भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमकतेचे गुणगान गात आहे. विराट कोहली हा माझ्यापेक्षा कैक पटीने आक्रमक आहे, असे सौरव म्हणाला.
एक कर्णधार म्हणून विराट कोहली माझ्यापेक्षा जास्त आक्रमक आहे, असे सौरव गांगुली म्हणाला. कोलकातामध्ये सौरव गांगुली क्रिकेट स्कूलच्या उद्घाटनावेळी तो बोलत होता.
पाहा..लॉर्ड्सवरील गांगुलीने असा केला होता जल्लोष…
विराटही काही कमी नाही. प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या बेन स्टोक्सलाही विराटने असे उत्तर दिले. पाहा….
https://twitter.com/DhoniKohliFever/status/803199679336828928
गांगुलीने यावेळी सांगितले की, आपल्या क्रिकेट कोचिंग स्कूलमध्ये १०० ते १५० प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षण देण्याचे काम येथे केले जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येईल. क्रिकेटला पश्चिम बंगालमध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम या स्कूलमधून होईल, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, भारत -इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात कर्णधार कोहली याने २३५ धावांची तडाखेबंद खेळी केली होती.
