न्यूझीलंड दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांत भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत आयसीसी कसोटी क्रमवारीत ९ वे स्थान प्राप्त केले आहे. विराट कोहलीचे कसोटी क्रिकेट करिअरमधील हे सर्वोत्तम स्थान आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत एकूण २१४ धावा ठोकल्या यानंतर ११ व्या स्थानावरून प्रगती होत कोहलीने ९ वे स्थान गाठले आहे.
पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानी चेतेश्वर पुजारा आणि आता नवव्या स्थानी विराट कोहली असे दोनच भारतीय फलंदाज आहेत. तर, दुसऱया बाजूला फिरकी गोलंदाज अश्विनची क्रमावारी दोन स्थानांनी घसरून १० व्या स्थानावर त्याला समाधान मानावे लागले आहे. किवींकडून तुफान फलंदाजी केलेल्या ब्रेन्डन मॅक्क्युलमच्याही कसोटी क्रमवारीत सुधारणा होऊन त्याने १२ वे स्थान गाठले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
कोहली ‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीत ९ व्या स्थानावर
न्यूझीलंड दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांत भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत आयसीसी कसोटी क्रमवारीत ९ वे स्थान प्राप्त केले आहे.

First published on: 19-02-2014 at 04:06 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kohli reaches career best 9th in icc test rankings