आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आयपीएल २०२१मधून बाहेर पडला आहे. कुलदीप यूएईमध्ये सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आणि आता त्याला संपूर्ण हंगामासाठी वगळण्यात आले आहे. कुलदीपची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही, पण मीडिया रिपोर्टनुसार तो भारतात परतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच कुलदीप यादवने कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले होते. वास्तविक कुलदीपला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नव्हती. दुसऱ्या टप्प्यापूर्वी एका मुलाखतीत त्याने यावर आपली निराशा व्यक्त केली होती.

कोलकाताने या मोसमात एकाही सामन्यात कुलदीपला संधी दिली नाही. त्याने गेल्या मोसमातही केवळ ५ सामने खेळले. कुलदीपचा फॉर्म खराब असला आणि तो फक्त एक विकेट घेऊ शकला. २०१९मध्ये कुलदीपने ९ सामन्यात फक्त ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IPL 2021: मॅच जिंकली आणि मनंही..! भावूक झालेल्या मुंबईच्या खेळाडूला विराटनं दिलं आधार; पाहा VIDEO

”खेळाडूला संघामधून का वगळण्यात आले आहे हे देखील त्याला माहीत नसते. जर प्रशिक्षकाने आधी तुमच्यासोबत काम केले असेल आणि तुमच्याशी दीर्घकाळ जुळले असेल, तर ते तुम्हाला अधिक चांगले समजून घेतील. पण जेव्हा संवाद कमकुवत होतो तेव्हा अनेक समस्या असतात. तुम्ही खेळत आहात का किंवा संघ तुमच्याकडून काय अपेक्षा करतो, हे तुम्हाला माहीत नसते”, असे कुलदीपने माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata knight riders spinner kuldeep yadav ruled out of ipl 2021 adn
First published on: 27-09-2021 at 16:03 IST