Kylian Mbappe reject offer Saudi Arabia: फ्रेंच स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेने सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबकडून खेळण्याची ऑफर नाकारली आहे. पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) कडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या एमबाप्पेने अल हिलालच्या प्रतिनिधींना भेटण्यास नकार दिला आहे. यामुळे सौदी क्लबच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. अल हिलालने एमबाप्पेसमोर ३०० दशलक्ष युरो (सुमारे २७२५ कोटी रुपये) ची विक्रमी ऑफर ठेवली होती. मात्र, एमबाप्पेने अल-हिलालचा प्रस्ताव धुडकावत सौदी अरेबियाला खेळायला जाणार नाही, असे सांगितले.

फ्रेंच स्टारने या बुधवारी पॅरिसमध्ये असलेल्या अल-हिलाल क्लबच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला, असे फ्रेंच वृत्तपत्र L’Equipe च्या अहवालात म्हटले आहे. झेनिट सेंट पीटर्सबर्ग येथून ब्राझिलियन खेळाडू माल्कमच्या हस्तांतरणास अंतिम रूप देण्यासाठी सौदी क्लबचे एक शिष्टमंडळ पॅरिसमध्ये आले. फ्रेंच राजधानीत असताना शिष्टमंडळाला आपला प्रस्ताव एमबाप्पेला सादर करायचा होता. मात्र, त्याने या शिष्टमंडळास भेटण्यास नकार दिला.

India vs Bangladesh 1st T20I Match Updates in Marathi
IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
Delivery boy killed
दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला
Big Finance Company Manger Suicide
Suicide : बड्या फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या, कामाचा ताण, काढून टाकण्याच्या धमक्यांमुळे उचललं पाऊल
IPL Auction 2025 Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma
‘रोहित शर्माला कर्णधार म्हणून घ्या…’, मोहम्मद कैफने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणाला दिला सल्ला? पाहा VIDEO
chess olympiad 2024, india women participants
बुद्धीबळ सम्राज्ञी… बुध्दीबळ ऑलिंपियाडमधल्या ‘त्या’ पाचजणी आहेत तरी कोण?
Three Walking yoga types to Include in Your Morning Walk – Viral Video
तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकला जाता? हे तीन प्रकार करा चालण्यात समाविष्ट, VIDEO एकदा पाहाच

एमबाप्पेने कधीही सौदीला जाण्याचा विचार केला नाही

अहवालात असे म्हटले गेले आहे की, “२४वर्षीय किलियन एमबाप्पे एजंटने सौदी क्लबच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला. फ्रान्सचा कर्णधार एमबाप्पे यांनी कधीही सौदी अरेबियाला जाण्याचा पर्याय विचारात घेतला नाही. रियाधस्थित अल हिलालला पीएसजीने एमबाप्पेशी बोलणी सुरू करण्याची परवानगी दिली होती. एमबाप्पेला कधीही सौदी लीगमध्ये खेळायचे नव्हते हे पीएसजीला माहीत होते. असे असतानाही त्यांनी अल-हिलालला परवानगी दिली होती. यामागील कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा: Ben Stokes: अ‍ॅम अ बार्बी गर्ल… बेन स्टोक्सची पत्रकार परिषद मार्क वुडने केली हायजॅक; मजेशीर Video व्हायरल

एमबाप्पे आणि पीएसजीमधील अंतर का वाढले?

एमबाप्पे गेल्या महिन्यात म्हणाला होता की, “तो पीएसजी बरोबरचा करार जून २०२४च्या पुढे वाढवू इच्छित नाही.” त्याच्या या वक्तव्याने क्लबला आश्चर्य वाटले. एमबाप्पेने २०२२मध्ये पीएसजीशी नवीन करार केला होता. त्यानंतर २०२५ पर्यंत संघासोबत राहण्याचे आश्वासन दिले. एमबाप्पे आणि पीएसजी यांच्यातील करारानुसार एमबाप्पे २०२४ पर्यंत क्लबचा खेळाडू राहील. जून २०२४ नंतर तो त्याचा करार एक वर्षासाठी वाढवू शकतो. आता एमबाप्पेने क्लबला एक वर्ष अगोदर पत्र लिहून जून २०२४ नंतर करार वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.

एमबाप्पे नवीन क्लबच्या शोधात आहे. पॅरिस सेंट-जर्मेनबरोबरचा त्याचा करार पुढे संपत आहे, परंतु क्लबने त्याला नवीन संघ शोधण्याचे आदेश दिले आहेत. क्लबने त्याला विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता ट्रान्सफर मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद सिराज भारतात परतला, जाणून घ्या

पीएसजी एमबाप्पेला सोडू इच्छित नाही

वास्तविक, पीएसजी कोणत्याही परिस्थितीत एमबाप्पेला मुक्त खेळाडू म्हणून जाऊ देऊ इच्छित नाही. यासाठी त्यांनी एम्बाप्पे याचे नाव बाजारात आणले आहे. ते जगातील इतर क्लबकडून एमबाप्पेसाठी बोली ऐकण्यास उत्सुक आहेत. मात्र, पीएसजीला वाटते की त्यांची फसवणूक झाली आहे. क्लबचा विश्वासू सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, एमबाप्पेने आधीच रिअल माद्रिद या क्लबकडून विनामूल्य हस्तांतरणास सहमती दर्शविली आहे.