scorecardresearch

बार्सिलोनाचा पराभव; लुकासचा निर्णायक गोल

कार्डिसकडून सोमवारी १-० अशा धक्कादायक पराभवामुळे बार्सिलोनाच्या ला लीग फुटबॉल जेतेपद पटकावण्याच्या अंधुकशा आशा मावळल्या आहेत.

माद्रिद : कार्डिसकडून सोमवारी १-० अशा धक्कादायक पराभवामुळे बार्सिलोनाच्या ला लीग फुटबॉल जेतेपद पटकावण्याच्या अंधुकशा आशा मावळल्या आहेत. गृहमैदानावरील या सामन्यात बार्सिलोनाच्या कामगिरीची संतप्त चाहत्यांनी हुर्यो केली. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला लुकास पेरेझने गोल करत कार्डिसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बार्सिलोनाकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, पण कार्डिसच्या बचावफळीने चांगली कामगिरी करत अखेपर्यंत आघाडी कायम ठेवत विजय नोंदवला.

गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या रेयाल माद्रिदच्या ते १५ गुणांनी मागे आहे. सध्याच्या हंगामात रेयाल माद्रिदला अजूनही सहा सामने खेळायचे आहेत, तर बार्सिलोनाचे सात सामने शिल्लक आहेत. गेल्या आठवडय़ात युरोपा लीगमध्येही त्यांना पराभूत व्हावे लागले होते. बार्सिलोनाला २००३ नंतर पहिल्यांदा कॅम्प नोऊ स्टेडियमवर सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: La liga football barcelona lose cardis lucas decisive goal ysh

ताज्या बातम्या