Laxman Sivaramakrishnan Controversial Statement About R Ashwin: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेला सुरू होण्यास आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सराव सामने सुरू झाले आहेत. यासाठी भारताने नुकताच विश्वचषक संघात एक बदल केला आहेत. दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णनने अश्विनबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारताचा माजी फिरकीपटू क्रिकेटपटूने अश्विनला स्वार्थी खेळाडू म्हणून संबोधले. तसेच म्हटले की जर एमएस धोनी आणि त्याची टीम चेन्नई सुपर किंग्स नसती तर त्याला भारतीय संघात येण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागली असती. यासोबतच त्याने आपल्या एक्स (ट्विट) पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतात ज्या काही खेळपट्ट्या बनवल्या जातात, त्या गोलंदाजांसाठी असतात जेणेकरून त्यांना विकेट मिळू शकतील.

Ashish Nehra Statement on Hardik Pandya
Hardik Pandya: “आश्चर्य नाही वाटलं कारण…” हार्दिक पंड्याला भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद न दिल्याबद्दल आशिष नेहराचे मोठे वक्तव्य
Dav Whatmore on Hardik Pandya
Hardik Pandya : ‘मला हार्दिकबद्दल आश्चर्य वाटते की त्याला…’, बडोद्याच्या माजी प्रशिक्षकाची भारताच्या अष्टपैलू खेळाडूवर टीका
Ajit Agarkar opens up on Abhishek Ruturaj
Ajit Agarkar : ‘आमचे काम फक्त…’, ऋतुराज-अभिषेकला संघातून वगळण्यावर अजित आगरकरांनी दिले स्पष्टीकरण
BCCI Unsure About Appoint Hardik Pandya as Permanent T20I Captain
Hardik Pandya: कर्णधार रोहितची शर्माच्या जागी कोण? सूर्यकुमार का हार्दिक? बीसीसीआयचा खल
Rohit Sharma Clean Bowled By PM Narendra Modi Video
Video: मोदींच्या प्रश्नावर रोहित शर्मा क्लीन बोल्ड! पंतप्रधानांना भारतीय कर्णधार म्हणाला, “विश्वचषक जिंकणं एकवेळ सोपं पण..”
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल
Rohit sharma grand welcome at home
VIDEO: जगज्जेत्या कर्णधाराचं घरी साजेसं स्वागत; बालपणीच्या मित्रांनी केला सॅल्युट, फुलांनी सजवलं घर
Rohit Sharma Stump Mic Upar Dega to Deta hai na Said to Suryakumar Yadav And Hits Six
IND vs ENG: “उपर डाला तो देता हूं ना…” हिटमॅन शब्दाचा पक्का, रोहितने सूर्याला सांगून लगावला दणदणीत षटकार; VIDEO व्हायरल

लक्ष्मण शिवरामकृष्णनने आपल्या पोस्टमध्ये लिहले, “भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसतात. कारण भारतातील कसोटी सामन्यांमधील खेळपट्ट्या अश्विनच्या गोलंदाजीला पूरक असतात. तुम्ही सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये त्याचा विक्रम पाहू शकता.”

सीएसके आणि एमएसडी नसते तर अश्विनला थांबावे लागले असते –

अश्विनवर निशाणा साधताना लक्ष्मण शिवरामकृष्णन म्हणाले, “जर सीएसके आणि एमएसडी नसते, तर आश्विनला जास्त वेळ थांबावे लागले असते. कारण त्यावेळी हरभजन शानदार गोलंदाजी करत होता. आश्विन भारतासाठी खेळला, इंडिया सिमेंट्स सोडली आणि प्रतिस्पर्धी कंपनी केमप्लास्टमध्ये सामील झाला. महान व्यक्तीने काय निष्ठा दाखवली. तुम्हाला त्याच्यासाठी मंदिर बांधावे लागेल. मर्यादीत षटकांतील राज्य स्पर्धेत लेग-स्पिन गोलंदाजी केली तर इतर कोणीही बाहेर फेकले गेले असते.”

हेही वाचा – MS Dhoni: माहीने ‘देसी बॉयज’मधील ‘झक मार के’ गाण्यावर साक्षीसमोर धरला ठेका, मजेशीर डान्सचा VIDEO होतोय व्हायरल

अश्विन समालोचनादरम्यान बकवास करणार –

शिवरामकृष्णन आश्विनवर टीका करताना म्हणाले, जेव्हा तो समालोचन करेल, तेव्हा तो बकवास करेल. “जेव्हा तो माईक उचलेल, तेव्हा तो नक्कीच जगातील सर्वोत्तम बकवास करणारा व्यक्ती असेल.” रविचंद्रन अश्विन सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि सतत क्रिकेटच्या समस्यांवर आपले मत मांडतो आणि त्याच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ देखील बनवतो.

अश्विनने बॉलिंग ॲक्शनबाबत केला होता संपर्क –

शिवरामकृष्णन यांनी सांगितले की, अलीकडेच अनुभवी ऑफस्पिनरने त्याच्या बॉलिंग ॲक्शनबाबत त्याच्यांशी संपर्क साधला होता. ते म्हणाले, “रवी अश्विनने काही काळापूर्वी माझ्याशी त्याच्या बॉलिंग ॲक्शनबाबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला होता. ट्रोर्ल्सच्या विषाने त्यालाही माझ्याइतकेच आश्चर्य वाटले. तसेच यात सहभागी असलेले लोक त्याच्याशी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाहीत, असेही स्पष्ट केले. रविचंद्रन अश्विनला शुभेच्छा.”