MS Dhoni dancing in front of Sakshi on the song Zhak Maar Ke: भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता निवृत्तीनंतरही कमी झालेली नाही. दररोज तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. दरम्यान, त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीचे हे रूप तुम्ही याआधी नक्कीच पाहिले नसेल. कारण धोनी चक्क देसी बॉयज चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

‘झक मार के’ गाण्यावर धोनीने धरला ठेका –

अलीकडेच धोनीचा नवा लूकचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता धोनीचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोनी बॉलिवूड चित्रपट ‘देसी बॉयज’मधील ‘झक मार के’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहे. पत्नी साक्षी धोनीही समोर दिसत असून धोनी हा डान्स फक्त तिच्या सांगण्यावरून करत असल्याचे दिसते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

एमएस धोनीने २००७ मध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले आणि पहिल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. गंभीर आणि धोनी यांनी मिळून टीम इंडियासाठी आयसीसी विश्वचषक २०११ चे विजेतेपद पटकावले होते. या दोघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली. धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या, तर गंभीरने ९७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

हेही वाचा – MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने टेनिस कोर्टवर दाखवली आपली जादू , केली जोरदार फटकेबाजी, पाहा VIDEO

आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याच्या यशाचा परिणाम फ्रँचायझी क्रिकेटवरही झाला. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट (आरपीजी) चे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केले. धोनीने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये सीएसकेला पाच आयपीएल खिताब जिंकून दिले. त्याने २०१० आणि २०१४ मध्ये सीएसकेला दोन चॅम्पियन्स लीग टी-२० विजेतेपदही पटकावून दिले.

धोनीने ३३२ सामन्यांमध्ये केले भारताचे नेतृत्व –

धोनीने एकूण ३३२ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे. त्यापैकी भारताने १७८ जिंकले, १२० गमावले, ६ बरोबरीत राहिले आणि १५ सामन्यांचा निकाल लागला नाही. कर्णधार म्हणून त्याची विजयाची टक्केवारी ५३.६१ आहे. त्याने जिंकलेल्या ट्रॉफींसह एकत्रितपणे तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. या ३३२ सामन्यांमध्ये त्याने ४६.८९ च्या सरासरीने आणि ७६ च्या स्ट्राईक रेटने ११,२०७ धावा केल्या. कर्णधार म्हणून त्याने ११ शतके आणि ७१ अर्धशतके झळकावली, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या २२४ आहे.

Story img Loader