30:30 Rule In Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यानंतर पुढील दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने २-१ ने आघाडी घेतली. मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक होता. पण हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत २-१ ने विजय मिळवला. पण सामना नेमका का थांबला आणि क्रिकेटमधील ३०-३० नियम काय आहे? जाणून घ्या.

क्रिकेटच्या मैदानावर सामना थांबण्याची काही महत्वाची कारणं असतात. पाऊस आला किंवा प्रकाश कमी असेल, तर सामना थांबवला जातो. पण वीज आणि ढगांच्या गडगडाटामुळे सामना थांबणं हे क्वचितच पाहायला मिळतं. कारण पावसामुळे बऱ्याचदा सामने थांबले आहेत. पण वीज आणि ढगांच्या गडगडाटामुळे सामना थांबवत नाहीत. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला पाचवा टी-२० सामना वीज चमकल्यामुळे थांबवण्यात आला. हा सामना ३०:३० नियमानुसार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान हा नियम नेमका काय आहे?अंपायर सायमन टॉफेल यांनी एका शोमध्ये समजावून सांगितला आहे.

काय आहे ३०:३० नियम?

सायमन टॉफेल हा नियम समजावून सांगताना म्हणाले की, गेल्या ५-६ वर्षांपासून आयसीसीने विजेसंदर्भातील एक महत्वाचा नियम लागू केला आहे. हा नियम ३०:३० नियम म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात सामना सुरू असताना पाऊस पडणं वीज चमकणे ही सामान्य गोष्ट आहे. पण वीज चमकताना दिसताच, अंपायर लगेचच टायमर लावतात. अंपायर ३० सेकंद वाट पाहतात. जर ३० सेकंदाच्या आत गडगडाट ऐकून आला, तर अंपायर तत्काळ खेळ थांबवतात आणि खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये जाण्यास सांगतात. यासह प्रेक्षकांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं जातं.

भारतीय संघाचा २-१ ने मालिका विजय

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजयाची नोंद केली. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून जिंकला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली. त्यानंतर मालिकेतील चौथ्या सामन्यातही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. चौथा सामना भारतीय संघाने ४८ धावांनी आपल्या नावावर केला. मालिकेतील पाचवा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक होता. पण विजांच्या कडकडाटामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.