फुटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी आणि नेमार यांना चीनची सिनोव्हॅक बायोटेकद्वारा निर्मित करोना लस दिली जाणार आहेत. या खेळाडूंसह दक्षिण अमेरिकेच्या शेकडो फुटबॉलपटूंनाही ही लस दिली जाईल. प्रादेशिक फुटबॉल फेडरेशन-कोन्मेबोल यांनी याची पुष्टी केली आहे.

कोन्मेबोलने सांगितले, की त्यांनी आपल्या १० सदस्य संघटनांना लस देणे सुरू केले आहे. गुरुवारी लसीची पहिली तुकडी उरुग्वेची राजधानी मॉन्टेविडीया येथे दाखल झाली. यात ५० हजार डोस आहेत. दक्षिण अमेरिकेच्या खेळाडूंना लस दिल्यानंतर या भागातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा कोपा अमेरिकेच्या आयोजनाची शक्यता वाढेल.

 

२०२०मध्ये कोपा अमेरिकेचा ४७वा हंगाम होणार होता, मात्र करोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. या स्पर्धेत नेमार आणि मेस्सीसारखे स्टार खेळाडू आपापल्या देशांकडून खेळतात आणि हे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण आहे.