डॅनियल स्टुरीज याने ७२व्या मिनिटाला केलेल्या सुरेख गोलमुळेच लिव्हरपूल संघाला इंग्लिश प्रीमिअर फुटबॉल लीगमध्ये न्यू कॅसलविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधता आली.
चुरशीने झालेल्या या लढतीत पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये १-१ अशी बरोबरी होती. न्यू कॅसल संघाच्या योहान कॅलिस याने २३ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. पूर्वार्ध संपायला तीन मिनिटे बाकी असताना लिव्हरपूल संघाला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत स्टीव्हन गेरार्ड याने गोल केला.
उत्तरार्धात पॉल डय़ुमेट याने जोरदार चाल करीत न्यू कॅसल संघास पुन्हा आघाडीवर नेले. त्याने ५६ व्या मिनिटाला हा गोल नोंदविला. त्यानंतर बराच वेळ त्यांनी आघाडी राखली होती. तथापि सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला लिव्हरपूल संघास गोल करण्याची संधी
मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत डॅनियल स्टुरीज याने हेडिंगच्या साहाय्याने गोल केला आणि २-२ अशी बरोबरी साधली. याच बरोबरीत सामना संपला. लिव्हरपूल संघाने १७ गुणांसह आघाडी स्थान कायम राखले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2013 रोजी प्रकाशित
लिव्हरपूलने न्यू कॅसलला बरोबरीत रोखले
डॅनियल स्टुरीज याने ७२व्या मिनिटाला केलेल्या सुरेख गोलमुळेच लिव्हरपूल संघाला इंग्लिश प्रीमिअर फुटबॉल लीगमध्ये न्यू कॅसलविरुद्ध

First published on: 20-10-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liverpool ends equal with newcastle