दोन विश्वचषकांवर आपले नाव कोरणारा वेस्ट इंडिज संघ यंदा टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ साठीही पात्र ठरला नाही. संघाच्या सतत खालवल्या जाणाऱ्या स्तरावर बोलताना डेरेन सॅमीला आपल्या भावनांवर आवर घालणे कठीण झाले. दरम्यान, पूर्व कप्तान डेरेन सॅमीने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला विरोध केला आहे. त्याने म्हटलंय की वेगवेगळ्या फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यापासून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड संघातील खेळाडूंना रोखू शकत नाही. कारण बोर्ड या खेळाडूंना कोणतीही आर्थिक सुरक्षा पुरवत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत सॅमी स्पष्टपणेच म्हणाला की बीसीसीआयप्रमाणे वेस्ट इंडिज बोर्ड आपल्या खेळाडूंना फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यापासून रोखू शकत नाही. तो पुढे म्हणाला की “भारत मजबूत आहे कारण त्यांच्याकडे पैसा आहे. याआधारे ते आपल्या खेळाडूंना इतर लीगमध्ये खेळण्यापासून रोखू शकतात.” सॅमीने सांगितल्याप्रमाणे भारतातील ए सूचीमधील करारबद्ध खेळाडू मॅच फी आणि टीव्ही अधिकार राशीमधून वर्षाला १० लाख डॉलर म्हणजेच जवळपास सात कोटींहून अधिक रक्कम कमावतात. या तुलनेत वेस्ट इंडिजच्या ए सूचीमधील करारबद्ध खेळाडूंची कमाई दीड लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास १.२ कोटी रुपये इतकीच आहे. सॅमी म्हणाला, “खेळाडूंना इतर ठिकाणांहून चांगली रक्कम मिळत असताना लहान बोर्डांसाठी आपल्या खेळाडूंना एकत्रित ठेवणे अतिशय कठीण आहे.”

लंडनच्या रस्त्यावर तरुणाने गायलं ‘केसरिया’ गाणं, अन्…; हा Viral Video पाहाच

सॅमी म्हणाला, “ते दिवस गेले जेव्हा आपण क्रिकेटच्या प्रेमासाठी खेळायचो. हे प्रेम तुम्हाला सुपरमार्केटमधून भाजीपाला विकत घेऊन देऊ शकत नाही.” दरम्यान, यावर्षी टी२० विश्वचषकासाठी संघाच्या प्रमुख खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत वेस्ट इंडिजच्या संघ व्यवस्थापनाकडे कोणतीही स्पष्टता नव्हती. आंद्रे रसेल निवडीसाठी उपलब्ध नव्हता, सुनील नरेनच्या उपलब्धतेची स्थिती काहीशी गूढ होती. तर एविन लुईस आणि ओशाने थॉमस त्यांच्या फिटनेस चाचणीसाठी उपस्थित नव्हते.

दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ टी२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रथम फेरीनंतर पुढे जाऊ शकलेला नाही. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच वेस्ट इंडिज संघाला बाहेर पडावे लागले. यासाठी संघाच्या खेळाडूंची खराब फलंदाजी कारणीभूत ठरली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love for cricket will not buy you vegetables from the market darren sammy was furious with the west indies board decision pvp
First published on: 02-11-2022 at 13:17 IST