scorecardresearch

LPL 2022: संघासाठी कायपण! दात तुटला पण पठ्याने कॅच नाही सोडला, श्रीलंका लीगमधील Video व्हायरल

बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान श्रीलंकन क्रिकेटर झेल घेताना जखमी झाला. लंका प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात तीन-चार दात तुटले.

LPL 2022: संघासाठी कायपण! दात तुटला पण पठ्याने कॅच नाही सोडला, श्रीलंका लीगमधील Video व्हायरल
सौजन्य- (लोकसत्ता ग्राफिक्स)

असे अनेकदा होते की, क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुखापतग्रस्त होत असतात. काही दुखापती या सामान्य असतात, तर काही दुखापती या खूपच गंभीर असतात. त्यामुळे दुखापतग्रस्त खेळाडूला रुग्णालयात दाखल करावे लागते. आताही अशीच वेदनादायी दुखापत क्रिकेट सामन्यादरम्यान घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये बुधवारी गॅले ग्लॅडिएटर्स आणि कॅंडी फाल्कन्स यांच्यात सामना झाला, जो कॅंडी फाल्कन्सने पाच विकेट्सने जिंकला. या सामन्यादरम्यान कॅंडी फाल्कन्सच्या चमिका करुणारत्नेने नुवानिंदू फर्नांडोचा अप्रतिम झेल घेतला, मात्र हा झेल टिपताना त्याचे तीन-चार दात तुटले. चेंडू चमिकाच्या चेहऱ्यावर लागला, पण त्याने झेल सोडला नाही. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ तुमचे लक्ष विचलित करू शकतो.

चमिका करुणारत्ने दुखापतग्रस्त

झेल घेतल्यानंतर चमिकाच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्याने चेंडू सहकारी खेळाडूकडे दिला. यानंतर चमिकाला रुग्णालयात न्यावे लागले. सामन्याच्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा प्रकार घडला, पाहा व्हिडिओ-

बरं, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या चमिका करुणारत्नेच्या दुखापतीचे ताजे अपडेट असे आहेत की, त्याने घेतलेला झेल अप्रतिम होता हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. सहसा असे झेल पकडणे सोपे नसते. चमिकासाठीही नाही. पण, त्याचवेळी त्याने स्वत:ला गंभीर दुखापत करून घेतली. मात्र, चमिकाच्या दुखापतीबाबत ताजी माहिती अशी की, तिला तातडीने शस्त्रक्रियेसाठी गाले येथे नेण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, तो लंका प्रीमियर लीगच्या कॅंडी स्टेजपासून संघासाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा: FIFA World Cup: फायनलमध्ये मेस्सी-रोनाल्डोची टक्कर? अशी समीकरणे झाली तर अर्जेंटिना-पोर्तुगालची लढत निश्चित

खरं तर, गाले ग्लॅडिएटर्स विरुद्ध कँडी फाल्कन संघातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. ग्लॅडिएटर्सचा फलंदाज नुवानीडू फर्नांडो याने कार्लोस ब्रेथवेटच्या चेंडूवर फटका मारला असता, चेंडू हवेत खूपच उंच गेला. यानंतर चमिका करुणारत्ने झेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली आला. यादरम्यान तो झेलाची लाईन समजू शकला नाही, त्यानंतर चेंडू थेट त्याच्या तोंडावर जाऊन लागला. चमिकाने झेल पकडला, परंतु जेव्हा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, तेव्हा समजले की, त्याच्या तोंडातून रक्त निघत आहे. त्याला तातडीने मैदान सोडावे लागले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे समजले की, त्याचे ४ दात तुटले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 16:47 IST

संबंधित बातम्या