Team India singing song with fans video viral : गेल्या शनिवारी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया गुरुवारी मायदेशी परतल्यावर विजयी मिरवणूक काढण्यात आली. टीम इंडियाच्या स्वागतासाठी जणू काही संपूर्ण मुंबई मरीन ड्राइव्हवर जमली होती. एकट्या मरीन ड्राइव्हवर तीन-चार लाख चाहते जमतील, असे कोणाला वाटले नव्हते. चाहत्यांची ही गर्दी पाहून टीम इंडिया भावूक आणि रोमांचित झाली. त्याचबरोबर सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये पन्नास हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. या स्टेडियमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाने प्रेक्षकांसह ‘मां तुझे सलाम’ गाणे गायले.

स्टेडियममध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही चाहत्यांना त्यांचे पूर्ण प्रेम परत केले. मैदानाला फेरी मारताना खेळाडूंनी जोरदार नृत्य केले. पण जेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये वंदे मंतरम हे गाणे वाजले, तेव्हा प्रेक्षक उभे राहिले आणि सुरात सामील झाले, त्यानंतर विराट, रोहित आणि सर्व खेळाडू त्यात सामील झाले आणि सुरात सामील झाले. चाहत्यांसह खेळाडूही ‘मां तुझे सलाम’ गाणे गाताना दिसले, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून पोस्ट केला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.

विषेश म्हणजे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश विनामूल्य होता. त्यामुळे विश्वविजेत्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये जमले होते. भारतीय संघाचा ताफा ९ वाजण्याच्या सुमारास स्टेडियममध्ये दाखल झाला असला तरी वानखेडे स्टेडियम मात्र तीन वाजताच भरले होते. विजय परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर मोटा जल्लोष करण्यात आला. यावेळी रोहित शर्माने आपले विचार मांडले. तसेच विराट कोहलीने सांगितले की विश्वचषक जिंकणे हे संघाचे संयुक्त ध्येय होते. त्याचवेळी आयपीएलमध्ये जाहीर टीकेचा सामना करणाऱ्या हार्दिक पंड्यावरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला.

हेही वाचा – Victory Parade : ‘११ वर्षानंतर आपण वर्ल्ड कप जिंकलोय नाचायला पाहिजे…’, रोहितची मराठीतून प्रतिक्रिया, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे स्टेडियमवर विराट-रोहितसह टीम इंडियाने केला डान्स –

विजय परेड संपवून वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मासह सर्व भारतीय संघाने एकत्र डान्स केला , ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट-रोहित चालता चालता दोघेही नाचू लागले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्यापासून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचल्यावर रोहित शर्मानेही थोडा डान्स केला. तो हॉटेलबाहेर नाचताना दिसला.