scorecardresearch

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: ठाणे, मुंबई शहर संघ उपांत्य फेरीत

अग्रमानांकित नागपूर आणि द्वितीय मानांकित पुणे या संघांनी सहज विजयासह सोमवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडिमटन क्रीडा प्रकारातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: ठाणे, मुंबई शहर संघ उपांत्य फेरीत
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नागपूर:अग्रमानांकित नागपूर आणि द्वितीय मानांकित पुणे या संघांनी सहज विजयासह सोमवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडिमटन क्रीडा प्रकारातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ठाणे आणि मुंबई शहर संघांनीही संघर्षपूर्ण विजयांसह आगेकूच केली.राज्य ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी नागपूर येथे झालेल्या बॅडिमटन स्पर्धेत पुरुष विभागात नागपूरने जळगावचा आणि पुण्याने सांगलीचा ३-० असा एकतर्फी लढतीत पराभव केला.

उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत ठाण्याने नाशिक आणि मुंबई शहरने पालघरचे आव्हान ३-१ असे परतवून लावले. दोन्ही संघांच्या विजयात दुहेरीतील जोडय़ांनी मिळविलेल्या यशाचा वाटा मोठा राहिला.महिला विभागातही नागपूर, पुणे, ठाणे संघांनी एकतर्फी विजयासह आपली आगेकूच कायम राखली. मुंबई शहरला या विभागातही विजयासाठी झगडावे लागले. मुंबई शहरने नाशिकचा २-१ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 04:42 IST

संबंधित बातम्या