पुणे : मल्लखांब या भारतीय क्रीडाप्रकाराला ८५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सादरीकरणाची संधी मिळणार आहे. जपानमधील टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० जुलै आणि १ ऑगस्ट १९३६ या कालावधीत बर्लिन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. विश्वनाथ कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर करून जगभरातील क्रीडापटूंची मने जिंकली होती. या संघाचा जर्मनीचे चॅन्सलर अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी प्रशस्तिपत्रक आणि सुवर्णपदक देऊन गौरव केला होता, अशी माहिती राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि प्रशिक्षक श्रीनिवास हवालदार यांनी दिली. टोक्योत ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्याची संधी मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallakhamb included in olympic after 85 year zws
First published on: 19-07-2021 at 02:44 IST