अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालं नाही. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. यामध्येच टीम इंडियाचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने अप्रत्यक्षरित्या रिया चक्रवर्तीला टोला लगावला आहे.
“पैसा हा कायम आळशी आणि कामचुकार महिलांनाच आकर्षित करत असतो. पण या उलट जर एखादी कष्ट करणारी स्त्री असेल तर तिच्यासाठी पैसे कमाविणारा व्यक्ती हा बोनसप्रमाणे असतो. ती शिडी म्हणून त्याचा वापर करत नाही”, असं ट्विट मनोज तिवारीने केलं आहे.
2 al d gold diggers out there. Read dis
Money only impresses lazy girls. Wen a women works hard, a man wit money is a bonus, not a ladder to upgrade #EDExposeRheaInSSRCase— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) August 10, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे रिया विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या रिया आणि तिच्या कुटुंबीयांची ईडी चौकशी सुरु असून या चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा होताना दिसून येत आहे.