अमेरिकन ओपन विजेता अँडी मरे व डेव्हिड फेरर यांनी सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मरे याने आठव्या मानांकित रिचर्ड गास्केट याचे आव्हान ६-७ (३-७), ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. तृतीय मानांकित खेळाडू फेरर याने पंधराव्या मानांकित टॉमी हास याची अनपेक्षित विजयाची मालिका ४-६, ६-२, ६-३ अशी खंडित केली. मरे व फेरर या दोन्ही खेळाडूंनी पहिला सेट गमावल्यानंतर सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळवित विजयश्री खेचून आणली. मरे याने २००९ मध्ये येथे विजेतेपद मिळविले होते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2013 रोजी प्रकाशित
मरे, फेरर अंतिम फेरीत
अमेरिकन ओपन विजेता अँडी मरे व डेव्हिड फेरर यांनी सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
First published on: 31-03-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mare ferar in final round