Mark Wood said if I bat at the top my nose will bleed: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना इंग्लंडने ३ विकेट्स राखून जिंकला. चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात इंग्लंडचे ७ गडी बाद झाले होते, मात्र ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांनी जबाबदारी घेत शानदार खेळी करत संघाला कठीण काळात विजय मिळवून दिला. वोक्सने ४७ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ३२ धावा केल्या. या सामन्यानंतर मार्क वुडने प्रतिक्रिया दिली.

मार्क वुडने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवला जोर –

सामन्यातील दुसऱ्या डावात मार्क वुडने ८ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार खेचून नाबाद १६ धावा केल्या. त्यीचबरोबर सामना जिंकून देणारी खेळी खेळली. मार्क वुड सामन्याचा हिरो ठरला. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीतही चमकदार कामगिरी केली. वुडने एकूण ७ विकेट घेतल्या, तर बॅटने ४० धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात त्याने ३०० च्या स्ट्राईक रेटने ८ चेंडूत २४ धावा केल्या. शानदार विजय आणि धडाकेबाज फलंदाजीनंतर, मार्क वुडला क्रमवारीत आणखी पुढे जाण्याबद्दल विचारले असता त्याने एक मजेदार उत्तर दिले.

जर मी वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली तर माझ्या नाकातून रक्त येईल –

विजयानंतर मार्क वूड म्हणाला, “सामनावीर किताब पटकावल्याचा आनंद आहे. खेळाडूंच्या हाताचे तळवे घामाघूम झाले आहेत. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करणे कठीण होते. मी पहिल्यांदाच फलंदाजी करत इंग्लंडला जिंकवले आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. जर मी वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली, तर माझ्या नाकातून रक्त येईल. त्यामुळे निश्चितपणे फलंदाजी क्रमांक ९ पेक्षा जास्त वरती नसावा.”
मार्क वूड पुढे म्हणाला, “मला चांगली लय जाणवत होती. शक्य तितक्या वेगाने धावण्याचा प्रयत्न केला. ८ चेंडूत २४ धावा केल्याचा मला आनंद होतो. मी कसे पुढे जायचे ते बघेन, पण तयार राहण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन.”

हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: ‘…म्हणून तो एक खास खेळाडू आहे’, विजयानंतर कर्णधार बेन स्टोक्सने मार्क वुडचे केले कौतुक, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टोक्सने वेगवान गोलंदाजी करण्यास सांगितले होते –

या सामन्यात वुडने ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, “मला माहित नाही की सर्वात वेगवान काय आहे, परंतु मी बॉब विलिसचा विचार करत होतो. मी माझ्या भूमिकेबाबत अगदी स्पष्ट आहे. मी शॉर्ट आणि वेगवान गोलंदाजी करतो. स्टोक्सने मला जमेल तितक्या वेगाने गोलंदाजी करण्यास सांगितले होते. माझ्याकडे जे काही आहे, त्यातून मी योगदान देतो. पुढील सामन्यात जाण्यासाठी अद्याप काही गोष्टींवर काम करणे बाकी आहे.