Marnus Labuschagne Says Once Rohit Sharma gets going he is hard to stop: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास फार दिवस शिल्लक राहिले नाहीत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये सर्वच संघ आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा प्रथमच भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे, यावेळी भारतीय कर्णधारही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माने ८१ धावांची शानदार खेळी केली. दरम्यान, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.

रोहित शर्मामध्ये जास्त जोखीम न घेता धावा करण्याची क्षमता –

विश्वचषक २०२३ मध्ये, ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया चेपॉक येथे ८ ऑक्टोबर रोजी एकत्र स्पर्धेला सुरुवात करतील. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये भारताने २-१ ने विजय मिळवला होता. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी फॉक्स क्रिकेटवर बोलताना मार्नस लॅबुशेनने रोहित शर्माच्या जास्त जोखीम न घेता धावा करण्याच्या क्षमतेचे कौतुक केले.

तुम्ही विरोधी संघाकडून शिकता –

मार्नस लाबुशेन म्हणाला, “रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे, ज्याने कोणतीही जोखीम न घेता मोकळेपणाने धावा केल्या आहेत. एकदा का तो हालचाल करू लागला की त्याला थांबवणे कठीण असते. मी रोहित सोबत चालताना त्याला सांगितले होते. मी म्हणालो होतो की, तुम्ही जे काही करता ते मी बघतो आणि मला शिकायचे आहे. या परिस्थितीत तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. तुम्ही विरोधी संघाकडून शिकता, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून तुम्ही शिकता. आम्ही प्रत्येक सामन्यात शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.’’

हेही वाचा – MS Dhoni: ‘मला वाटत नाही…’; माहीच्या नेतृत्वाबद्दल गंभीरचं पुन्हा एकदा विश्वचषकापूर्वी मोठं वक्तव्य, पाहा VIDEO

लाबुशेन पुढे म्हणाला की, जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याने रोहितला सांगितले की मला तुझ्याकडून शिकायचे आहे. लाबुशेनने सांगितले की, त्याने रोहितला सांगितले होते की, आम्हाला य़ेथील परिस्थितीची माहिती नाही आणि तू इथे महान खेळाडू आहेस. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मार्नस लाबुशेन खराब फॉर्ममध्ये होता, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला विश्वचषक संघात स्थान देण्यात आले.

हेही वाचा – MS Dhoni: माहीचा नवा लूक! महेंद्र सिंग धोनीच्या पोनी-टेल हेअरस्टाइलचा VIDEO होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्नस लाबुशेनबद्दल सांगायचे तर, अॅश्टन अगरच्या दुखापतीनंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. मार्नस लाबुशेनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोन शानदार इनिंग खेळल्या होत्या. त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने ३९, २७ आणि ७२ धावांची इनिंग खेळली. मार्नस लाबुशेन ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या क्रमांकावर चमकदार खेळताना दिसणार आहे.