पाच वेळच्या विश्वविजेत्या भारताच्या एम. सी. मेरी कोम हिने आशियाई स्पर्धेत बुधवारी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. मेरी कोमच्या यशामुळे भारताने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या सात झाली आहे.
फोटो गॅलरी : भारताची ‘सुवर्ण’मॉम
३१ वर्षीय मेरी कोमने व्हिएतनामच्या ले थी बँग हिचा ३-० असा सहज पाडाव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीमध्ये तिने कझाकस्तानच्या झैना शेकेरबेकोवा हिचा २-० ने पराभव केला. चार फैऱयांपैकी पहिल्य फेरीमध्ये झैनाचे वर्चस्व राहिले. मात्र, त्यानंतरच्या तिन्ही फेऱयांमध्ये मेरी कोमने आपले वर्चस्व कायम ठेवले. चार पैकी दोन फेऱयांमध्ये तिने ३० गुण मिळवले. तिन्ही पंचांनी मेरी कोमला १० गुण देत विजयी घोषित केले.
दरम्यान, नुकत्याच येऊन गेलेल्य़ा ‘मेरी कोम’ या बॉलीवूडपटात मेरी कोमची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही सुवर्णपदक जिंकल्याबदद्ल टि्वटरवरून एम. सी. मेरी कोमचे अभिनंदन केले.
So proud of u @mangtec u r a true champ!! My Shero! Be #Unbeatable Be #Unbreakable Be #MaryKom pic.twitter.com/v4G5THGqmV
— PRIYANKA (@priyankachopra) October 1, 2014
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.