scorecardresearch

MCA Awards Function: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार

MCA Annual Awards: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए क्लबमध्ये पार पडला. या सोहळ्यात श्रेयस अय्यर पृथ्वी शॉ आणि इतर महाराष्ट्रीयन खेळाडूंचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

MCA Awards Function: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार
श्रेयस अय्यर (फोटो- ट्विटर)

भारत आणि श्रीलंका संघांत १० जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. या मालिकेतून संघातील स्टार खेळाडूही पुनरागमन करणार आहेत. अलीकडेच कर्णधार रोहित शर्मानेही त्याचा जिममध्ये वर्कआउट करताना व्हिडिओ शेअर केला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरला या मालिकेपूर्वी पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला वार्षिक मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) पुरस्कार कार्यक्रमात पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए क्लबमध्ये शुक्रवारी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. श्रेयस अय्यरसाठी २०२२ हे अतुलनीय वर्ष गेले. तो भारताच्या मधल्या फळीत, विशेषत: पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचा खेळाडू ठरला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात (एमसीए वार्षिक पुरस्कार) त्याला ८ पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर युवा खेळाडू पृथ्वी शॉला ९ पुरस्कार मिळाले. सरफराज आणि त्याच्या भावाने डझनाहून अधिक पुरस्कारांवर कब्जा केला. याशिवाय श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज धवन कुलकर्णी यांच्याशिवाय भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही सन्मान करण्यात आला.

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांसारख्या स्टार फलंदाजांना आपल्या बॅटने मागे टाकत अय्यरने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. टीम इंडियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू बनला. २०२२ मध्ये, अय्यरने ४८.७५ च्या सरासरीने १६०९ आंतरराष्ट्रीय धावा केल्या. त्याने ११३* च्या सर्वोत्तम खेळीसह एक शतक आणि १४ अर्धशतके झळकावली.

पाच कसोटींमध्ये, अय्यरने आठ डावांत चार अर्धशतकांसह ६०.२८ च्या सरासरीने ४२२ धावा केल्या. त्याने वर्षाचा शेवट ९२ च्या सर्वोत्तम कसोटी स्कोअरसह केला. १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ५५.६९ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या. ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याने १५ डावांमध्ये एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावून, ११३* च्या सर्वोत्कृष्ट स्कोअरसह सर्व फॉरमॅटमध्ये अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली.

अय्यरने ३५.६१च्या सरासरीने आणि १४१.१५च्या स्ट्राइक रेटने ४६३ धावा करत टी-२० मध्येही आपला अव्वल फॉर्म दाखवला. त्याने २०२२ मध्ये २० षटकांच्या फॉर्मेटमध्ये ७४* च्या सर्वोत्तम स्कोअरसह चार अर्धशतके झळकावली होती. त्याच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश होता.

हेही वाचा – ODI World Cup 2023: के. श्रीकांत यांनी भारताच्या संभाव्य विश्वचषक संघातून ‘या’ दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल , कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 17:01 IST

संबंधित बातम्या