MI vs UPW Highlights in Marathi: मुंबई इंडियन्सच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर युपीच्या संघाचा एकतर्फी पराभव करत ८ विकेट्सने सामना जिंकला. मुंबई संघाच्या नताली स्किव्हर ब्रंट आणि हिली मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने १४३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. या विजयासह मुंबईचा संघ आता वुमन्स प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यूपी संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १४२ धावा केल्या. मुंबई संघाने १४३ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पार करत गुणतालिकेचा संपूर्ण खेळच बदलून टाकला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या यूपी वॉरियर्सने सलामीच्या जोडीत मोठा फेरबदल केला. ज्याचा संघाला चांगलाच फायदा झाला. पण मधल्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. ग्रेस हॅरिसने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिला साथ देत वृंदा दिनेशनेही ३३ धावा केल्या. युपीने ८१ धावांत फक्त २ विकेट्स गमावले होते. पण ग्रेस हॅरिसची विकेट गेल्यानंतर युपी संघाच्या धावांना ब्रेक लागला आणि मुंबईच्या गोलदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. मुंबईकडून नॅट स्किव्हर ब्रंटने ३ विकेट्स, शबनब इस्माईल आणि संस्कृती गुप्ताने २ विकेट्स तर हिली आणि अमेलिया केरने १-१ विकेट घेतली. वादळी सुरूवात होऊनही यूपीचा संघ १४३ धावाच करू शकला.
Loving the view ? #AaliRe #MumbaiIndians #TATAWPL #MIvUPW ? pic.twitter.com/z026nfLM1R
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Mumbai Indians (@mipaltan) February 26, 2025
युपीने दिलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतान मुंबईने ६ धावांवर यास्तिका भाटियाची पहिली विकेट गमावली. यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाची व्हाईट बॉल अष्टपैलू खेळाडू हिली मॅथ्यूज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसली. पण अखेरीस तिने मोठे प्रयत्न करत आपला फॉर्म परत मिळवत ५० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. शानदार फॉर्मात असलेल्या नॅट स्किव्हर ब्रंटने ४४ चेंडूत १३ चौकारांसह ७५ धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली. तर हिली बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने विजयी चौकार लगावत १७व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला.