पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. परंतु यावेळी तो चक्क भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीमुळे चर्चेत आहे. आमिरने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील व्यक्ती हुबेहुब विराटसारखाच दिसतोय. हा फोटो पाहून तुम्हाला देखील हाच प्रश्न पडेल की हा विराट तर नाही ना?
@imVkohli brother is it you m confused pic.twitter.com/kbwn31yjT6
— Mohammad Amir (@iamamirofficial) May 15, 2020
आमिरने पोस्ट केलेल्या फोटोमधील व्यक्ती हातात धनुष्य घेऊन उभा आहे. खरं तर हा फोटो Ertugrul या टीव्ही मालिकेमधील आहे. ही एक टर्किश ड्रामा सीरिज आहे. या मालिकेतील अभिनेता Cavit Çetin Güner हा दाढी वाढवल्यानंतर विराट कोहली सारखाच दिसतो. त्याने या मालिकेत ‘इर्त गुल गाजी’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या सीरिजचा पाचवा सिझन सध्या नेटफ्लिक्सवर सुरु आहे.
View this post on Instagram
काही प्रमाणात ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारखी असलेली ही मालिका मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आमिरने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
