सलामीवीर मोहम्मद हाफीझच्या दिमाखदार शतकाच्या बळावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३ बाद २८१ धावा उभारल्या.
हाफीझने पाकिस्तानच्या डावाला आकार देताना नाबाद १७८ धावा केल्या. त्याने कसोटी कारकीर्दीतील सातवे आणि मालिकेतील दुसरे शतक झळकावले. हाफीझने आपल्या आक्रमक खेळीत २३ चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.