Mohammed Shami Clean Bold Marnus Labuschagne Video Viral : लंडनच्या द ओव्हल मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या दिवशीही मजबूत स्थितीत राहण्यासाठी टीम इंडियाचे प्रयत्न सुरु आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा शून्यावर असताना त्रिफळा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर शार्दूल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला ४३ धावांवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. त्यानंतर मोहम्मद शमीने वेगवान मारा करत मार्नस लाबुशेनची दांडी गुल केली. शमीच्या भेदक माऱ्यापुढं लाबुशेन बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. शमीने लाबुशेनचा त्रिफळा उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – WTC Final : टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मधून अनुभवी गोलंदाज रविचंद्रन आश्विनला का डावललं? रोहित शर्माने सांगितलं यामागचं कारण, म्हणाला…

२५ व्या षटकातील पहिला चेंडू शमीने अचूक टप्प्यावर फेकला. त्यामुळे लाबुशेनला या चेंडूचा अंदाज घेता आला नाही आणि चेंडू टप्प्यावर पडल्यानंतर थेट स्टंपला लागला आणि लाबुशेन बाद झाला. लाबुशेन २६ धावा करून तंबूत परतला. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात मजबूत स्थितीत राहता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami dismissed marnus labuschagne on 26 runs watch shami clean bold marnus labuschagne video viral ind vs aus wtc final nss
First published on: 08-06-2023 at 15:55 IST