Mohammed Siraj Ben Stokes Controversy Wicket Celebration Video: भारत आणि इंग्लंड लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताकडून भेदक गोलंदाजी पाहायला मिळत आहे. तिसऱ्या दिवशी अखेरच्या षटकात झालेल्या वादानंतर मैदानावर फारच दबावाचं वातावरण भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी तयार केलं आहे. यादरम्यानच सिराज गोलंदाजीवर आक्रमक फटके खेळायला गेलेला डकेट मात्र झेलबाद झाला. सिराजने या विकेटचं बोल्ड सेलिब्रेशन करत डकेटला धक्का दिला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर मैदानावर एकंदरीतच खेळाडूंनी दबावाचं वातावरण ठेवलं होतं. बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांना संघाचे खेळाडू सातत्याने काही ना काही बोलत हुर्याे उडवत होते. यादरम्यान बुमराहच्या षटकात शांतपणे खेळून काढत आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला बेन डकेट मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज झाला.
मोहम्मद सिराज सहावे षटक टाकण्यासाठी आला होता. सिराजच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लॅप शॉट मारत चौकार लगावला. हा शॉट सहसा वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये फलंदाजांना आपण खेळताना पाहिलं आहे. यानंतर सिराज चांगलाच वैतागला होता. त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव राहिला. यानंतर पाचव्या चेंडूवर डकेट पूल शॉट खेळण्यासाठी गेला, पण चेंडू बॅटची कड घेत समोरच्या दिशेला गेला आणि बुमराहने सोपा झेल टिपला.
आपल्या गोलंदाजीवर आक्रमक फटके खेळत असणारा डकेट बाद होताच सिराजने गर्जना करत आनंद साजरा केला. सिराज गर्जना करत त्याच्याजवळ पोहोचला आणि त्याच्या जवळ जात आक्रमक सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन करताना सिराजचा खांदाही डकेटला लागला. तितक्यात सुंदरने येऊन सिराजला सावरलं. या विकेटनंतरच्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
मोहम्मद सिराजने बेन डकेटला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर पंचांनी सिराजला बोलावत त्याच्या सेलिब्रेशनबद्दल त्याला समजूत देण्यात आली. सिराजने डकेटच्या फार जवळ जाऊन सेलिब्रेशन केलं होतं.