Mohammed Siraj 200 Wickets : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात गोलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांना एका पाठोपाठ एक ३ मोठे धक्के दिले. सिराजचे टप्पा पडताच वेगाने आत येणाऱ्या चेंडू इंग्लंडच्या फलंदाजांच्या पॅडला जाऊन लागत होते. त्याने पोप, रूट आणि बेथल यांना पायचीत करत माघारी धाडलं. यादरम्यान त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ओली पोपला भन्नाट वेगवान चेंडू टाकून पायचीत करत माघारी धाडलं. यासह सिराजने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओली पोप हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा २०० वा बळी ठरला आहे. या सामन्यातून प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मोहम्मद सिराज या गोलंदाजी आक्रमणाच्या प्रमुखाची भूमिका बजावतोय. याआधी दुसऱ्या कसोटीतही जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी केली होती.आताही बुमराहच्या अनुपस्थितीत त्याने दमदार गोलंदाजी केली आहे.

सिराजच्या २०० विकेट्स पूर्ण

तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये ११५ गडी बाद केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने ७१ गडी बाद केले आहेत. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने १४ गडी बाद केले आहेत. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० गडी बाद केले आहेत. तो भारतीय संघासाठी १०१ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याने १३४ डावात २०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हापासून सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे, तेव्हापासून केवळ ५ फलंदाजां आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा पराक्रम करता आला आहे. जसप्रीत बुमराहने ३६७ गडी बाद केले आहेत. तर मोहम्मद शमीने २७७, रवींद्र जडेजाने २७४ गडी बाद केले आहेत. तर कुलदीप यादवने २७३, आर अश्विनने २७१ गडी बाद केले आहेत.

सिराजची दमदार गोलंदाजी

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना सिराचच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने आधी ओली पोपला बाद करत माघारी धाडलं.त्यानंतर जो रूट आणि जेकब बेथलला बाद करत माघारी धाडलं. या दमदार गोलंदाजीमुळे चांगली सुरूवात मिळाली असतानाही इंग्लंडचा संघ पिछाडीवर आहे.