Monty Panesar’s Warning to India : इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने टीम इंडियाला इशारा दिला आहे. ऑली पोप आणि टॉम हार्टले यांनी आपली कामगिरी कायम ठेवल्यास भारताला कसोटी मालिकेत ०-५ असा पराभव स्वीकारावा लागू शकतो, असे तो म्हणाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पानेसरने इशारा दिला आहे की, ऑली पोप आणि टॉम हार्टले यांनी हैदराबादमध्ये दाखवलेला खेळ कायम ठेवल्यास पाहुण्या संघ भारताचा सफाया करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी पानेसर म्हणाला की, जर पोप आणि हार्टले हैदराबादमध्ये खेळत राहिले, तर इंग्लंड भारताचा सफाया करेल. दुसऱ्या डावात पोपने १९६ धावा केल्या आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले, तर हार्टलेने दुसऱ्या डावात सात विकेट्स घेत आपल्या संघाला हैदराबादमध्ये रोमांचक विजय मिळवून दिला.

“इंग्लंड ५-० ने मालिका जिंकू शकेल” –

माजी क्रिकेटपटू माँटी पानेसर म्हणाला, “जर ऑली पोप आणि टॉम हार्टले असेच खेळत राहिले, तर इंग्लंड ५-० ने मालिका जिंकू शकेल. हा खूप मोठा विजय आहे, हे शक्य होईल असे कोणालाही वाटले नव्हते. प्रत्येकाला वाटले होते की इंग्लंड १९० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर हरेल, परंतु ऑली पोपने एक शानदार खेळी खेळली, जी दीर्घकाळातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे आणि रोहित शर्माला याची कल्पना नव्हती.”

हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘…उत्सव की तैयारी करो’, सरफराजच्या निवडीनतंर सूर्यकुमार यादवने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी

“विश्वचषक जिंकल्यासारखे वाटत आहे” –

तो पुढे म्हणाला की, हा इंग्लंडच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक होता आणि इंग्लंडने विश्वचषक जिंकल्यासारखे वाटले. १० वर्षांच्या कालावधीत घरच्या कसोटी सामन्यात भारताचा हा चौथा पराभव ठरला. पानेसर म्हणाले, “इंग्लंडच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम विजयांपैकी हा एक होता. इंग्लंडमध्ये ही मोठी बातमी आहे. कारण विश्वचषक जिंकल्यासारखे वाटत आहे.”

हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झालेला सौरभ कुमार कोण आहे? जाणून घ्या

इंग्लंडचे २०१२/१३ नंतर भारतीय भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे लक्ष्य असेल. २०१२ मध्ये ॲलिस्टर कुकने आपल्या संघाला भारताविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला होता. त्यानंतर इंग्लंडने भारतात दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत. इंग्लंडला २०१६/१७ मध्ये ०-४ आणि २०२०/२१ मध्ये १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमधील पराभवानंतर, यजमान २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monty panesar warns india that england will win the test series five zero vbm
First published on: 30-01-2024 at 11:46 IST