वारणानगर येथे झालेल्या जागतिक मल्ल युध्दात भारताचा आशियाई कास्यपदक विजेता मौसम खत्री याने नायजेरियाचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बोल्टिक सिन्वीस याच्यावर आठ गुणांनी मात करून ‘जनसुराज्य शक्ती केसरी किताब’ पटकाविला. या मैदानात भारतीय मल्लांनी नेत्रदीपक कामगिरी करत नायजेरिया, पाकिस्तानच्या पैलवानांना अस्मान दाखविले.
भारत विरुध्द पाकिस्तान, नायजेरिया यांच्या मल्लातील लढती हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते. वारणा साखर केसरी किताबासाठी झालेल्या कुस्तीत नरसिंग यादवने नायजेरिच्या तमारू सोसो याच्यावर एकलंगी डाव टाकत मात केली. सेनादलाच्या युध्दवीर सिंगने ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील याला सातव्या मिनिटाला हप्ता डावावर पराभूत करून ‘वारणा दूध केसरी किताब’ पटकाविला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘जनसुराज्य शक्ती केसरी किताबा’चा मानकरी मौसम खत्री
वारणानगर येथे झालेल्या जागतिक मल्ल युध्दात भारताचा आशियाई कास्यपदक विजेता मौसम खत्री याने नायजेरियाचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बोल्टिक सिन्वीस याच्यावर आठ गुणांनी मात करून ‘जनसुराज्य शक्ती केसरी किताब’ पटकाविला. या मैदानात भारतीय मल्लांनी नेत्रदीपक कामगिरी करत नायजेरिया, पाकिस्तानच्या पैलवानांना अस्मान दाखविले.
First published on: 14-12-2012 at 04:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mousam khatri winner in jansurajya shakti kesari