MS Dhoni attend India vs Germany Hockey Match in Ranchi : भारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारी एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये जर्मनीकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज महेंद्रसिंग धोनी देखील त्याच्या मूळ गावी रांची येथे होणारा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. या विजयासह जर्मनीने पॅरिस ऑलिम्पिकच्या तिकीटावर शिक्कामोर्तब केले आहे. भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची आणखी एक संधी आहे.

शुक्रवारी तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठीच्या लढतीत जपानचा पराभव करून हा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो. या स्पर्धेतील अव्वल तीन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या जर्मनीचा शुक्रवारी अंतिम फेरीत अमेरिकेशी सामना होईल, तर भारतीय संघाचा तिसऱ्या क्रमांकासाठी जपानशी सामना होईल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानला अमेरिकेकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

झारखंडमधील रांची येथील मरंग गोमके जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर पूर्ण वेळेपर्यंत भारत आणि जर्मनीने १-१ गोल ​​केले होते, त्यानंतर अतिरिक्त वेळेत २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये देखील दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन गोल केल्यानंतर पुन्हा एकदा बरोबरीवर झाली. त्यानंतर आणखी एक शूटआउट आयोजित केले गेले, जेथे जर्मनीच्या नशिबाने त्यांना साथ दिली आणि त्यांनी सामना १-० ने जिंकला. भारताकडून दीपिका (१५वे मिनिट) आणि इशिका चौधरी (५९वे मिनिट) यांनी निर्धारित वेळेत गोल केले. जर्मनीसाठी शार्लोट स्टेपनहॉर्स्टने (२७वा, ५७वा) दोन्ही गोल केले.

हेही वाचा – PCB : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी दिला राजीनामा

महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांपैकी एक नाव आहे, ज्याने टीम इंडियाला २००७ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. सामन्यादरम्यान, जेव्हा जेव्हा कॅमेरा महेंद्रसिंग धोनीकडे गेला, तेव्हा स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहिला मिळाला. आता धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.