चेन्नईच्या संघाने IPL 2020मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. या कामगिरीमुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करण्यात आली. पण तरीदेखील चेन्नईने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला यंदा होणाऱ्या हंगामासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवलं. संघात करारबद्ध ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश झाला आणि त्यामुळे महेंद्रसिंग धोनी IPLच्या इतिहासात एक पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला. IPL मध्ये १५० कोटींची मिळकत कमावणारा धोनी पहिला क्रिकेटपटू ठरला.

IND vs ENG : इंग्लंडच्या विजयात कोहलीचा अडथळा -अली

IPL 2020 पर्यंत धोनीने IPL च्या माध्यमातून १३७ कोटी रुपये कमावले होते. ज्या दिवशी धोनीला चेन्नईने संघात कायम राखले त्या दिवशी धोनीने १५० कोटींचा टप्पा ओलांडला. धोनीला IPL 2021 साठी चेन्नईने १५ कोटींना करारबद्ध केले. त्यामुळे त्याची IPL च्या माध्यमातून झालेली एकूण कमाई १५२ कोटी झाली. २०१८पासून धोनीला प्रत्येक वर्षी चेन्नईकडून एक हंगामाचे १५ कोटी रुपये दिले जातात. IPL च्या पहिल्या हंगामात २००८ साली धोनीला ६ कोटींना विकत घेतल होतं. त्यावेळी धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पुढील ३ वर्षे समान रक्कम मिळत होती. त्यानंतर २०११ ते २०१३ दरम्यान त्याला प्रत्येक हंगामात ८.२८ कोटींचे मानधन मिळत होतं. २०१४ ते २०१७ ही रक्कम प्रत्येक हंगामासाठी १२.५ कोटी इतकी होती.

‘आयपीएल’चे १४वे पर्व ११ एप्रिलपासून?

IPL कमाईत रोहित विराटपेक्षा सरस आहे. रोहित शर्माचं एका हंगामाचं मानधन विराटपेक्षा २ कोटींनी कमी आहे. पण IPL सुरू झाल्यापासून आतापर्यंतची कमाई पाहता रोहित त्याच्यापेक्षा सरस आहे. रोहित शर्माचं एका हंगामाचं सध्याचं मानधन १५ कोटी इतकं आहे. पण त्याची IPLमधील एकूण कमाई १४६.६० कोटी इतकी आहे. तर विराटचं एका हंगामातील मानधन सध्या १७ कोटी आहे, पण IPLमधील त्याची एकूण कमाई ही १४३.२० कोटी इतकीच आहे.