धोनीला मिळाली खास भेट, ‘चांगलं आहे’ म्हणत धोनीने केलं ‘त्या’ व्यक्तीचे कौतुक

सुपर किंग्ज चार विजय आणि नऊ पराभवांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

एमएस धोनी आपल्या चाहत्यांची मने जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. चेन्नई सुपर किंग्जने ‘कॅप्टन कूल’चा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे. फ्रेंचायझीने एका चाहत्याचे पत्र फ्रेम करून धोनीला भेट म्हणून दिले आहे. यावर धोनीने केवळ स्वाक्षरीच नाही केली तर ‘चांगले लिहिले आहेस, शुभेच्छा’ असा संदेशही दिला आहे.

कर्णधारपद पुन्हा धोनीकडे
धोनीने आत्तापर्यंत चार वेळा चेन्नईला विजेतेपद जिंकून दिले आहे. मात्र, यंदाच्या २०२२ च्या हंगामात धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यामुळे अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला होता. धोनीनंतर संघाची जबाबदारी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली होती. मात्र, बरगडीच्या दुखपतीमुळे जडेजा स्पर्धेच्या मध्यातूनच बाहेर पडला. आणि पुन्हा ही जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे आली.

चेन्नई नवव्या स्थानावर
कर्णधार पद पुन्हा एकदा धोनीकडे अल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, धोनीला १३ सामन्यांमध्ये केवळ २०६ धावाच काढता आल्या. गुजरात आणि चेन्नईदरम्यान झालेल्या सामन्यात गुजरातचा ७ गडी राखून विजय मिळवला होता. गुजरातचा १३ सामन्यांमधला हा १०वा विजय आहे. या विजयानंतर गुजरातने थेट क्वालिफायर-१ मध्ये प्रवेश केला आहे. तर सुपर किंग्ज चार विजय आणि नऊ पराभवांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni responds to letter from chennai super kings fan dpj

Next Story
IPL 2022  KKR vs LSG : कोलकाताला लखनऊविरुद्ध मोठा विजय आवश्यक; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ११
फोटो गॅलरी