भारताचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अलीकडेच मानद लेफ्टनंट कर्नल सन्मान दिला असतानाच त्याच्या इच्छेनुसार आता त्याला आग्रा येथील पॅरा रेजिमेंट येथे दोन आठवडय़ांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. धोनीने स्वत:च आपल्याला प्रशिक्षण मिळावे अशी विनंती लष्करी अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली होती. त्यानुसार त्याला परवानगी दिल्यानंतर तो ५ ऑगस्टला पॅरा ट्रेनिंग स्कूल येथे दाखल झाला. क्रिकेट सोडल्यानंतर लष्करात सक्रिय होण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. दोन आठवडय़ांच्या प्रशिक्षणानंतर तो पॅराशूट भरारीचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सीतांशु कार यांनी सांगितले. धोनीला २०११ मध्ये पॅराशूट रेजिमेंटकडून ‘मानद लेफ्टनंट कर्नल’ किताब देण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
धोनीचे आग्रा पॅरा रेजिमेंटमध्ये दोन आठवडय़ांचे प्रशिक्षण
भारताचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अलीकडेच मानद लेफ्टनंट कर्नल सन्मान दिला असतानाच त्याच्या इच्छेनुसार आता त्याला आग्रा येथील पॅरा रेजिमेंट येथे दोन आठवडय़ांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

First published on: 08-08-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni training with indian army