scorecardresearch

MS Dhoni Video: ‘बॉलरही तोच, बॅटमनही तोच…!’ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला माहीचा मजेशीर Video

धोनी आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईचे नेतृत्व करेल. या मोसमासाठी तो जोरदार सराव करत आहे. फलंदाजीसोबतच धोनीने सराव दरम्यान गोलंदाजीही केली.

MS Dhoni Video: Bowler as well as Dhoni batting as well CSK shared such a video fan go berserk
सौजन्य- CSK (ट्विटर)

आयपीएल २०२३, ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. जरी बहुतेक संघांचे स्टार खेळाडू सध्या सराव करत नसले तरी ते त्यांच्या देशासाठी खेळत आहेत, इतरांनी खूप पूर्वीपासून सराव सुरू केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच संपली. अशा स्थितीत दोन्ही संघांचे खेळाडू विश्रांती घेत आहेत. काही काळानंतर हे सर्व खेळाडू त्यांच्या आयपीएल संघात सामील होतील.

महेंद्रसिंग धोनीसह अनेक खेळाडू आधीच त्यांच्या संघात सामील झाले आहेत आणि तयारी करत आहेत. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी एकाच वेळी फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळे शॉट्स खेळले जात आहेत, पहिल्या शॉटमध्ये धोनी बॉलिंग करताना दिसत आहे, तर दुसऱ्या शॉटमध्ये तो बॅटिंग करून मोठा शॉट मारताना दिसत आहे. यानंतर त्याची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

चेन्नईच्या टीमने व्हिडिओ शेअर करत ‘माहीज मल्टीवर्स’ असे लिहिले आहे. मात्र, हे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळ्या काळातील आहेत. धोनी पहिल्या शॉटमध्ये गोलंदाजी करत आहे. मात्र, धोनी कोणाकडे गोलंदाजी करत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर, दुसऱ्या शॉटमध्ये तो फलंदाजी करतोय, पण गोलंदाज कोण आहे हे दिसत नाही.

धोनी याआधीही नेटमध्ये गोलंदाजी करत आहे

महेंद्रसिंग धोनी हा यष्टिरक्षक फलंदाज असून त्याला सामन्यादरम्यान गोलंदाजी करावी लागत नाही, पण त्याला गोलंदाजी करायला आवडते. या कारणास्तव, तो नेटमध्ये भरपूर गोलंदाजी करतो आणि आवश्यकतेनुसार सामन्यांमध्येही गोलंदाजी करतो. सराव करताना धोनीला खूप घाम येतो. याच कारणामुळे ४० चा टप्पा पार करूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. व्हिडिओत सुरुवातील धोनी फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे. कमाल म्हणजे या चेंडूवर फलंदाजी करताना देखील धोनीच दिसतो. सीएसकेने शेअर केलेला हा व्हिडिओ अवघ्या २० सेकंदांचा आहे, पण चाहत्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडिओत धोनी स्वतःच्याच चेंडूवर जबरदस्त षटकार मारला आहे.

हेही वाचा: IPL 2023: मुंबई इंडियन्समध्ये दोन पाकिस्तानी खेळाडूंची एन्ट्री, शाहरुख खाननेही KKRमध्ये केला एका खेळाडूचा समावेश, जाणून घ्या

दरम्यान, आयपीएल २०२३ धोनीच्या कारकिर्दीतील शेवटची आयपीएल असू शकते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. पण आयपीएलमध्ये मात्र तो अजूनही खेळत आहे. मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. मात्र, यावर्षी या चर्चा अधिकच होत आहे. कारण धोनीने आधी सांगितल्याप्रमाणे तो यावर्षी आपल्या होम ग्राऊंडवर चाहत्यांच्या समोर आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. धोनीने आयपीएल आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत चार ट्रॉफी जिंकल्या आहेत. यावर्षी देखील दो संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी प्रयत्नशील अलेल. यावर्षीच सीएसकेने आयपीएल ट्रॉफी जिंकली, तर संघ मुंबई इंडियन्सच्या पाच आयपीएल ट्रॉफिंची बरोबरी करू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 15:42 IST

संबंधित बातम्या