MS Dhoni drive Rolls Royce car: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस. धोनी नुकताच रांचीमध्ये विंटेज रोल्स रॉयस चालवताना दिसला. धोनीच्या सर्व चाहत्यांना जरी माहित असले तरी धोनीला वेगवेगळ्या वाहनांची खूप आवड आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे किमान १५ हाय-एंड कार आणि ७० बाइक्स आहेत. दरम्यान, धोनी (एमएस धोनी बाईक कलेक्शन) रांचीमध्ये विंटेज रोल्स रॉयस चालवताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

माहितीसाठी की, आयपीएलचा सर्वाधिक वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस. धोनीची फॅन फॉलोइंग जगभरात पाहायला मिळते. धोनीलाही वाहनांबद्दल खूप प्रेम असल्याचं पाहायला मिळतं आणि ते सर्वश्रुत असून त्याच्या चाहत्यांना देखील माहिती आहे. धोनी अनेकदा रांचीमध्ये कार किंवा बाईक चालवताना दिसतो. यावेळी तर धोनी निळ्या रंगाची विंटेज रोल्स रॉयस चालवताना दिसला जी त्याच्यापेक्षा एका वर्षाने मोठी आहे.

कॅप्टन कूल १९८०ची विंटेज रोल्स रॉयस चालवताना दिसला

विशेष म्हणजे, एका चाहत्याने टिपलेल्या व्हिडीओमध्ये धोनी रांचीच्या रस्त्यावर त्याची विंटेज १९८० रोल्स रॉयस चालवताना दिसत आहे. रांचीच्या रस्त्यांवर फिरण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे धोनी त्याच्या निळ्या रंगाची रोल्स रॉयस चालवताना चित्रित होण्याकडे दुर्लक्ष करतो.

हेही वाचा: ICC Test Rankings: आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा जलवा! शतकवीर यशस्वीची मोठी झेप, रोहितचे झाले प्रमोशन

धोनीच्या ताफ्यात कोटींचे कार कलेक्शन

एम.एस. धोनीच्या कारचे कलेक्शनमध्ये ७५ लाख रुपये किमतीच्या Hummer H2 पासून ते ६१ लाख रुपयांच्या अलीकडेच विकत घेतलेल्या KIA EV6 पर्यंत आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक आकर्षक कार आहेत. त्याचबरोबर धोनीला बाइक्सचीही खूप आवड आहे. नुकताच धोनीच्या बाईक कलेक्शनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओतील बाईक कलेक्शन पाहून हे एक आकर्षक बाईक शोरूम आहे असे वाटले.

अलीकडेच रांची येथे धोनीच्या घरी, टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी यांनी माहीची बाईक आणि कार कलेक्शन पाहण्यासाठी हजेरी लावली होती. सुनील जोशी यांनी कमेंट केली आहे की, “आवड असावी तर धोनीसारखी.” भारतीय संघात प्रशिक्षकाची भूमिका साकारणारा प्रसाद गंमतीने म्हणाला, “हे मला तर बाइकचे शोरूम वाटत आहे.”

प्रसाद यांनी तो व्हिडीओ ट्वीट केला होता आणि त्यात लिहिलं होतं की, “मी या माणसामध्ये जबरदस्त पॅशन पाहिलं आहे, काय कलेक्शन आणि कसला माणूस MSD. ही माहीच्या रांचीच्या घरातील बाईक आणि कारच्या कलेक्शनची एक झलक आहे, त्याच्या या पॅशनने मी थक्क झालो आहे.”