एम एस धोनी आणि हुक्का हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. इरफान पठाणने केलेल्या वक्तव्यामुळे हुक्का आणि धोनी चर्चेत आलं आहे. यादरम्यान धोनी युएस ओपनचा सामना पाहण्यासाठी पोहोचल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यूएस ओपन २०२५मधील नोवाक जोकोविचचा सामना पाहण्यासाठी धोनीने हजेरी लावली होती. दरम्यान चाहत्यांनी या फोटोसह

धोनी युएस ओपन २०२५ चा उपांत्य फेरीचा सामना पाहताना दिसला. या सामन्यात जगातील सातव्या क्रमांकाचा खेळाडू नोवाक जोकोविचने टेलर फ्रिट्झचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्योगपती हितेश संघवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धोनीबरोबरचा एक फोटो आणि जोकोविचच्या सामन्याची क्लिप शेअर केली. या क्वार्टरफायनल सामन्यात जोकोविचने फ्रिट्झचा ६-३, ७-५, ३-६, ६-४ असा पराभव केला.

जोकोविचने या हंगामात चारही प्रमुख स्पर्धांमध्ये किमान उपांत्य फेरी तरी गाठली आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना कार्लोस अल्काराझशी होईल, ज्याला त्याने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पराभूत करत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर या वर्षी जानेवारीमध्ये तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला. जोकोविचचा २२ वर्षीय खेळाडूविरुद्ध ५-३ असा विक्रम आहे.

दरम्यान धोनीसह नोवाक जोकोविचचा एक फोटोही व्हायरल होत आहे. यावर चाहत्याने धोनी आणि नोवाक जोकोविच सामना संपल्यानंतर एकत्र हुक्का पार्टी केल्याचं म्हटलं आहे. तर चाहत्यांनीदेखील या फोटोवर एकापेक्षा एक प्रतिक्रिया दिल्या आहेत. धोनी आणि नोवाकचा फोटो शेअर करत चाहत्याने या फोटोला कॅप्शन दिलं आहे. तर चाहत्यांनी धोनीच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

याचबरोबर धोनी सध्या युएसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याच्या पोस्टदेखील समोर येत आहेत. दरम्यान धोनी पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. धोनीचं वय आणि त्याचा फिटनेस पाहता धोनीने देखील याबाबत स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.

धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. आयपीएल २०२५ मध्ये महेंद्रसिंग धोनीची कामगिरी खूपच साधारण राहिली होती. या हंगामात त्याने १४ सामने खेळले. यामध्ये त्याने २४.५० च्या सरासरीने फक्त १९६ धावा केल्या. याशिवाय, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरीही खूपच खराब होती आणि संघ गुणतालिकेत तळाशी होता.