एकापेक्षा दिग्गज हॉकीपटूंची फौज असतानाही मुंबई मॅजिशियन्समागील पराभवाची साडेसाती संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी महिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबई मॅजिशियन्सना हॉकी इंडिया लीगमधील आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे मुंबईचे उपांत्य फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मुंबईवर १-३ अशी मात करत जेपी पंजाब वॉरियर्सने मुंबईविरुद्धचे तिन्ही सामने जिंकण्याची करामत केली.
प्रत्येक सामन्यागणिक कमी होणारी प्रेक्षकांची उपस्थिती आणि मुंबई मॅजिशियन्सची खालावणारी कामगिरी यामुळे स्पर्धेतील रंगत संपल्याचे मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यावरून जाणवत होते. या स्पर्धेत सुरेख कामगिरी करणाऱ्या पंजाबने अपेक्षेप्रमाणे मुंबईची बचावफळी सहजपणे भेदत पहिल्या सत्रातच दोन गोल झळकावले. आक्रमक खेळ करणाऱ्या पंजाबने मुंबईचे प्रतिहल्ले सहज परतवून लावले. दुसऱ्या सत्रात गोल करून मुंबईने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण पंजाबने तिसरा गोल करून मुंबईला ‘मुँहतोड जवाब’ दिला. पेनल्टीकॉर्नरचा हुकुमी एक्का असलेल्या आणि मुंबईच्या एकमेव विजयात मोलाची भूमिका निभावलेल्या संदीप सिंगला एकही पेनल्टीकॉर्नरचे गोलात रुपांतर करता आले नाही. पंजाब वॉरियर्सकडून धरमवीर सिंग (सातव्या मिनिटाला), रॉबर्ट हॅमन्ड (२२व्या मिनिटाला) आणि मलक सिंग (५२व्या मिनिटाला) यांनी गोल केले. मुंबईकडून जॉनी जसरोटियाने (४७व्या मिनिटाला) एकमेव गोल नोंदवला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2013 रोजी प्रकाशित
हॉकी इंडिया लीग : मुंबईचा ‘आठवा’वा पराभव!
एकापेक्षा दिग्गज हॉकीपटूंची फौज असतानाही मुंबई मॅजिशियन्समागील पराभवाची साडेसाती संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी महिंद्रा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबई मॅजिशियन्सना हॉकी इंडिया लीगमधील आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे मुंबईचे उपांत्य फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
First published on: 01-02-2013 at 04:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai eight lost in hero hil