Bangladesh vs Ireland : आयर्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकूर रहीमने १२६ आणि शाकिब अल हसनने ८७ धावांची खेळी केली. मुशफिकूर रहीमचं कसोटी क्रिकेटमधील हे १० वं शतक आहे. रहीमने शतकी खेळी करताना एक खास विक्रम केला आहे. मुशफिकूर रहीम आरर्लंडच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी अफगानिस्तानच्या रहमत शाहने आरर्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात ९८ धावा धावांची खेळी केली होती. तसंच इंग्लंडच्या जॅक लीचने आयर्लंडविरुद्ध वर्ष २०१९ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ९२ धावा केल्या होत्या.

मुशफिकूर आयर्लंडविरुद्ध शतक ठोकणारा जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे. याचसोबत मुशफिकूर रहीम कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून सर्वात जास्त शतक ठोकणारा दुसरा फलंदाज बनला आहे. बांगलादेशचा मोमिनल हकने कसोटी क्रिकेटमध्ये ११ शतक ठोकले आहेत. तर मुशफिकूर रहीम बांगलादेशसाठी सर्वात जास्त धावा करणारा फलंदाजही बनला आहे. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या इनिंगमध्ये आयर्लंडच्या संघाने २१४ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशने ३६९ धावा केल्या.

नक्की वाचा – खराब प्रदर्शनामुळं सुनील गावसकर कोलकाताच्या ‘या’ स्टार खेळाडूवर भडकले, म्हणाले, “काहीच केलं नाही आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेशसाठी सर्वात जास्त धावा करणारे टॉप ५ खेळाडू

मुशफिकूर रहीम, सामने-८५, धावा-५४४७
तमीम इकबाल, सामने -७०, धावा- ५१०३
शाकिब अल हसन, सामने-६६, धावा-४४५४
मोमिनल हक, सामने – ५६, धावा – ३६३५
हबीबुल बसहर, सामने -५०, धावा – ३०२६