इंग्लंडविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन आपल्या सर्वांना माहिती आहे. अजुनही अनेकांनी या सेलिब्रेशनची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गांगुलीच्या मुलीला आपल्या वडिलांनी टी-शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन काही केल्या पटलं नव्हतं. गौरव कपूर याच्या ‘Breakfast With Champions’ कार्यक्रमात सौरव गांगुलीने याबद्दलची कबुली दिली आहे.

त्या प्रकारानंतर मी देखील थोडासा शरमलो होतो. एकदिवस माझ्या मुलीने मला अनपेक्षितरित्या त्या सेलिब्रेशनबद्दल विचारलं. बाबा, तुम्ही असं का वागलात? क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर असं करणं गरजेचं असतं का? यावर उत्तर देताना मी माझ्या मुलीची समजूत काढून तो प्रकार माझ्याकडून चुकून झाल्याचं मान्य केलं. सौरवने लॉर्ड्सवरील सेलिब्रेशनबद्दल आपली बाजू मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचवेळी सौरवने त्या सेलिब्रेशनदरम्यान लक्ष्मणनेही आपल्याला टी-शर्ट काढू नको असा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यावेळी मी वेगळ्याच जोशात असल्यामुळे कोणाचंही न ऐकता मी टी-शर्ट काढून सेलिब्रेट केलं. या कार्यक्रमात सौरवने महेंद्रसिंह धोनी आणि इतर खेळाडूंबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे.