Namibia’s announced 15 member squad for the World Cup 2024 : नामिबिया संघाने दक्षिण आफ्रिकेतील क्वालिफायर सामना जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकात स्थान मिळवले आहे. आता या स्पर्धेसाठी नामिबियाने आपला संघ जाहीर केला आहे. १५ सदस्यीय संघाची कमान अॅलेक्स वोलोशेन्को यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच गेरहार्ड जॅन्स व्हॅन रेन्सबर्ग हा उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे. पुढील वर्षी १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप होणार आहे.

तथापि, यापूर्वी हा विश्वचषक श्रीलंकेत आयोजित केला जाणार होता, परंतु आयसीसी बोर्डाने श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित केले आणि अंडर-१९ विश्वचषक देखील हलवला. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणारा आहे, ज्यांना प्रत्येकी चारच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जाईल.

नामिबियाचा संघ क गटात असून त्यात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचाही समावेश आहे. याशिवाय गतविजेत्या भारताला अ गटात बांगलादेश, आयर्लंड आणि यूएसए सोबत ठेवण्यात आले आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ यांचा समावेश आहे.

हेही वाचा – BBL 2023 : बीसीसीआयवर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची झाली नाचक्की! बीबीएलमध्ये सहा षटकानंतर सामना…

या स्पर्धेच्या १५ आवृत्त्यांपैकी नामिबियाने नऊ वेळा भाग घेतला आहे. नामिबियाने पहिल्यांदा १९९८ मध्ये स्पर्धेत भाग घेतला होता, तर हा संघ शेवटचा २०१८ मध्ये सहभागी झाला होता.उल्लेखनीय आहे की, आफ्रिका क्वालिफायर जिंकून नामिबियाने पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. संघाने स्पर्धेतील पहिला सामना वगळता सर्व जिंकले होते आणि तो अपराजित राहिला होता. युगांडा विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, पण त्यानंतर नामिबियाने शानदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना एकही संधी दिली नाही.

हेही वाचा – IND vs SA : भारतीय वनडे संघावर माजी खेळाडूंनी दिली प्रतिक्रिया, युजवेंद्र चहलच्या निवडीबद्दल व्यक्त केले आश्चर्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२४ साठी नामिबिया संघ –

अॅलेक्स वोल्शेंक (कर्णधार), गेरहार्ड जॅन्स व्हॅन रेन्सबर्ग (उप-कर्णधार), हॅन्सी डिव्हिलियर्स, जेडब्ल्यू विसागी, बेन ब्रासेल, जॅक ब्रासेल, हेन्री व्हॅन विक, झॅको व्हॅन वुरेन, निको पीटर्स, फाफ डु प्लेसिस, वूटी न्यूहॉस, पीडी ब्लिगनाट हॅनरो बॅडेनहॉर्स्ट, ज्युनियर करियाटा आणि रायन मॉफेट