Who is The mystery man with Natasa Stankovic amid divorce rumours: हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक हे जोडपे घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, नताशा मुंबईमध्ये स्पॉट झाली होती, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका मुलासोबत दिसत आहे, त्यामुळे चर्चांना वेगळंच वळण मिळालं आहे. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशा एका तिसऱ्याचं व्यक्तीसोबत दिसल्याने हा मिस्ट्री मॅन नेमका कोण आहे आणि तो नताशासोबत काय करतोय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाची अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. एका रेडिट पोस्टने दावा केला आहे की त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. लवकरच दोघेही एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात. मात्र, नताशाने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा हार्दिककडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पण नताशाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने आणि कृणाल पंड्याच्या तिच्या कमेंटमुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे. हार्दिक आणि नताशामध्ये नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज चाहते लावत आहेत. या अफवांच्या दरम्यान, अभिनेत्री पहिल्यांदाच बाहेर दिसली. व्हिडिओमध्ये नताशा एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसत आहे. तिच्यासोबत तिचा जवळचा मित्र अलेक्झांडर एलिकही दिसत आहे.

हार्दिक पंड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशा स्टॅनकोव्हिक कोणासोबत दिसली?

नताशासोबत असलेला हा व्यक्ती बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. त्याचसोबत तो फिटनेस ट्रेनरही आहे ज्याचं नाव अलेक्झांडर एलिक आहे. अलेक्झांडर एलिक हा हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा जवळचा मित्र आहे. याआधीही दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. अलेक्झांडरला अनेकवेळा हार्दिक आणि नताशाचा मुलगा अगस्त्यासोबत त्याचे फोटो, व्हीडिओही पाहायला मिळाले आहेत. पण घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान नताशा त्याच्यासोबत स्पॉट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

पंड्या आणि नताशाच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना तेव्हा वेग आला जेव्हा नताशाने सोशल मीडियावर तिच्या नावातून पंड्या हे आडनाव काढून टाकले. तेव्हापासून लोक सोशल मीडियावर या जोडप्याबद्दल विविध प्रकारच्या अफवा सुरू आहेत. घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक मोठी बातमी व्हायरल झाली ती म्हणजे जर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर हार्दिक पांड्याची ७० टक्के संपत्ती त्याच्या पत्नीच्या नावावर जाईल. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की घटस्फोट झाल्यास हार्दिकच्या संपत्तीपैकी ७० टक्के नताशाच्या नावावर होईल. पण याचदरम्यान हार्दिकचं एक जुन वक्तव्य समोर येत आहे, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, त्याची सर्व संपत्ती ही त्याच्या आईच्या नावाने खरेदी करतो आणि ती त्याच्या आईच्या नावावर आहे.