Nathan Lyon 3rd Australian to play 100 Tests consecutive: लॉर्ड्सवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेस मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मैदानात उतरताच नॅथन लायनने ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलग १०० कसोटी सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यासोबतच सलग १०० कसोटी सामने खेळणारा तो एकूण सहावा खेळाडू ठरला आहे.

मला याचा खूप अभिमान आहे –

डेली मेलशी बोलताना नॅथन लायन म्हणाला, “मला याचा खूप अभिमान आहे, पण मला ट्रेंट ब्रिजचा तो दिवस चांगला आठवतो. जेव्हा मला सांगण्यात आले की मी खेळत नाही. मला फक्त इतके आठवते की, मी त्या दिवशी ब्रॅड हॅडिनच्या पलंगावर बसून याबद्दल बोलत होतो.”

त्यावेळी माझ्या मनात अनेक विचार सुरू होते –

नॅथन लायनला २०१३ च्या ॲशेस मालिकेची आठवण झाली. ज्यामध्ये त्याला संघातून वगळण्यात आले होते आणि त्याच्या जागी युवा ॲश्टन आगरला खेळण्याची संधी दिली गेली होती. त्या दिवसाबद्दल नॅथन म्हणाला की, “मला वाटले की माझे करिअर संपले आहे आणि त्यावेळी माझ्या मनात अनेक विचार सुरू होते.”

हेही वाचा – Saba Karim: अजिंक्य रहाणेला नव्हे ‘या’ खेळाडूला उपकर्णधार करावे, भारताच्या माजी खेळाडूची मागणी

मला वाटलं माझं करिअर संपलं –

२०१३ मध्ये त्याला संघातून वगळण्यात आलेला दिवस आठवून नॅथन लायन म्हणाला की, “जेव्हा तुम्हाला संघातून वगळले जाते, तेव्हा खूप विचित्र भावना असते. विशेषत: जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत नवीन असाल. त्यावेळी तुमचं करिअर संपलं असं वाटतं. आता पुढे काय करणार? माझे कुटुंब अजूनही माझ्यावर प्रेम करेल का? त्यावेळी असे विचार मनात येत राहतात.”

सलग १०० कसोटी सामने खेळलेले खेळाडू –

१५९ – ॲलिस्टर कुक (इंग्लंड)
१५३ – ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
१०७ – मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
१०६ – सुनील गावस्कर (भारत)
१०१ – ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)
१००* – नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया)

हेही वाचा – ODI WC 2023: पंजाबच्या क्रीडा मंत्र्यांच्या आरोपावर बीसीसीआयने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, “मोहालीचे स्टेडियम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात –

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. कांगारू संघाने १७ षटकांत कोणतेही नुकसान न करता ३९ धावा केल्या आहेत. वॉर्नर २९ आणि उस्मान ख्वाजा ९ धावांवर नाबाद आहे. इंग्लंड आपल्या पहिल्या विकेटच्या शोधात आहे.