नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसच्या सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात होणार असून, महाराष्ट्राच्या आशा सनिल शेट्टी आणि दिया चितळे यांच्यावर अवलंबून आहेत.

गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला २९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, ३० सप्टेंबरपासून जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा रंगणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंना खेळता यावे यासाठी यातील टेबल टेनिसच्या स्पर्धा लवकर खेळवण्यात येत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये शरथ कमाल, जी. साथियन आणि मनिका बात्रा यांसारखे भारताचे प्रमुख खेळाडू सहभाग नोंदवतील. 

महाराष्ट्राच्या पुरुष संघात सनिलसह दिपीत पाटील, सिद्धेश पांडे, रवींद्र कोटियन, रिगन अल्बुकर्क, तर महिला संघात दियासह रिथ रिश्या, स्वस्तिका घोष, श्रुती अमृते आणि अनन्या बसाक यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.